IND vs AUS : एक भारतीयच ठरणार भारताची डोकेदुखी; 21 वर्षाचा युवा गोलंदाज भल्या भल्यांची भंबेरी उडवणार?

IND vs AUS Tanveer Sangha
IND vs AUS Tanveer Sanghaesakal
Updated on

IND vs AUS Tanveer Sangha : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 वनडे सामन्यांची मालिका उद्या ( दि. 22) पासून सुरू होत आहे. वर्ल्डकपपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही तगड्या संघासाठी ही मालिका एक चांगला सराव ठरणार आहे.

मात्र या मालिकेत भारताची खरी परीक्षा असणार आहे. कांगारूंकडे तगडे वेगवान गोलंदाज आहेतच त्याचबरोबर आता त्यांच्या संघात 21 वर्षाचा युवा लेग स्पिनर देखील सामील झाला आहे. विशेष म्हणजे भारतीय वंशाचा असल्याने फिरकी ही त्याच्या डीएनएमध्येच आहे. या गोलंदाजाचे नाव आहे तनवीर संघा!

IND vs AUS Tanveer Sangha
World Cup 2023 : 'या' दोन खेळाडूंमुळे संजूचा वर्ल्डकपमधून पत्ता कट, हरभजन सिंगच्या वक्तव्याने उडाली खळबळ

येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आयसीसी वनडे वर्ल्डकप 2023 पूर्वी भारतीय संघाने आपल्या सरावात कोणतीही कसूर ठेवलेली नाही. आशिया कपमध्ये आशिया खंडातील तगड्या संघांसोबत दोन हात केल्यानंतर आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

भारताचा वर्ल्डकपमधील पहिला सामना हा 8 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाबरोबरच होणार आहे. तब्बल 5 वेळा वर्ल्डकप जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान हे कायमच तगडे असते. त्यामुळे या तीन वनडे मालिकेत दोन्ही संघ आपली ताकद आणि वेगवेगळे कॉम्बिनेशन आजमावून पाहतील.

ऑस्ट्रेलियाकडे भारताविरूद्धच्या या मालिकेसाठी एक खास फिरकीपटू देखील आहे. हा फिरकीपटू भारतीय फलंदाजांच्या नाकात दम करू शकतो कारण हा भारतीय वंशाचा फिरकीपटू असून त्याने पदार्पणातच आपला डंका वाजवला आहे.

21 वर्षाचा युवा फिरकीपटू तनवीर संघा भारताविरूद्धच्या तीन वनडे मालिकेत खेळणार आहे. त्याचा जन्म हा सिडनी शहरातच झाला. त्याचे वडील जोगा संघा हे भारतीय आहेत. जोगा हे जलंधरपासून थोड्या अंतरावर असणाऱ्या रहीमपूर गावचे रहिवासी होते. ते 1997 मध्ये भारतातून ऑस्ट्रेलियात आले.

तनवीर संघा अनेकवेळा भारतात आला आहे. तो आता भारताविरूद्धच्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

IND vs AUS Tanveer Sangha
Hemangi Kavi: "हा म्हावरा कुठं गावला?" हेमांगी कवी - युवराज सिंग एकत्र, हे आहे खास कारण

कसं आहे तनवीरचं ट्रॅक रेकॉर्ड?

तनवीर हा लेग स्पिनर असून त्याने नुकतेच दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झालेल्या टी 20 मालिकेत ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण केले. त्याने आपल्या पहिल्याच सामन्यात 4 विकेट्स घेत मोठा धमाका केला. संघाने ऑस्ट्रेलियाकडून वनडे आणि टी 20 फॉरमॅटमध्ये पदार्पण केलं आहे.

त्याने ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत 1 वनडे आणि 2 टी 20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने वनडेत 1 तर टी 20 मध्ये 5 विकेट्स घेतल्या आहेत. तनवीर आता भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो. भारतीय खेळपट्ट्या या फिरकीला पोषक असतात. आशा आहे की त्याला वनडे मालिकेत प्लेईंग 11 मध्ये खेळण्याची संधी मिळेल.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.