Tata Mumbai Marathon : आशियातील सर्वात मोठी आणि बहुचर्चित टाटा मुंबई मॅरेथॉनला आज, रविवारी २१ जानेवारीला सुरुवात झाली. या मॅरेथॉनसाठी संपूर्ण मुंबईनगरी सज्ज झाली होती. या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणारे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय धावपटू सुद्धा सज्ज झाले. ऑलिम्पिक पदक विजेती आणि दोन वेळची जगज्जेती पोल व्हॉल्ट पटू केटी मून ही या टाटा मुंबई मॅरेथॉन २०२४ ची आंतरराष्ट्रीय ॲम्बेसेडर आहे.
या मॅरेथॉनमध्ये एकूण ५९,५१५ स्पर्धकांनी भाग घेतला. राज्यपाल रमेश बैस, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या उपस्थित मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील यावेळी उपस्थिती लावली होती.
प्रथम क्रमांक : सावन बरवाल - १ तास ५ मिनटे ७ सेकंद
द्वितीय क्रमांक : किरण म्हात्रे - १ तास ६ मिनटे २३ सेकंद
तृतीय क्रमांक : मोहन सैनी - १ तास ६ मिनटे ५५ सेकंद
विशेष म्हणजे हे तीनही विजेते इंडियन आर्मीमध्ये कार्यरत आहेत.
प्रथम क्रमांक : अमरीता पटेल - १ तास १९ मिनटे २० सेकंद
द्वितीय क्रमांक : पूनम दिनकर - १ तास १९ मिनटे २० सेकंद
तृतीय क्रमांक : कविता यादव - १ तास २० मिनटे ४५ सेकंद
४२.१९५ किलो मीटरची मुख्य मॅरेथॉन ही पहाटे ५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू झाली होती.
२१.०९७ किलोमीटरची अर्ध मॅरेथॉन ही पहाटे ५ वाजता माहीम रेतीबंदर, माहीम कॉजवे इथून सुरू झाली होती. तर १० किलो मीटरची मॅरेथॉन सकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथून सुरू झाली.
मुख्य एलिट हौशी मॅरेथॉन सकाळी ७:२० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू झाली. त्याचबरोबर ७:२२ मिनिटांनी चॅम्पियनशिप विथ डिसॅबिलिटी (विकलांग) ही १:०३ किलोमीटरची मॅरेथॉन सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू झाली.
सीनियर सिटीजन रन ही ४:०२ किलोमीटरची दौड सकाळी ७:३५ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरु होणार होती. सकाळी ८ वाजता ड्रीम रन ही ५:०९ किलोमीटरची दौड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुरू झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.