वर्षात सलग 20 विजय मिळवणारा 'स्पॅनिश बुल' अमेरिकन टेलरने रोखला

Taylor Fritz Broke Rafael Nadal unbeaten streak of 20 Matches
Taylor Fritz Broke Rafael Nadal unbeaten streak of 20 Matches ESAKAL
Updated on

कॅलिफॉर्निया : जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या राफेल नदालने (Rafael Nadal) 2022 च्या हंगामात आतापर्यंत सलग 20 सामने जिंकले होते. मात्र ही विजयी घोडदौड अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झने (Taylor Fritz) इंडियन वेल्स (Indian Wells) स्पर्धेच्या फायनलमध्ये रोखली. 21 ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या राफेल नदालचा स्थानिक खेळाडू टेलर फ्रिट्झने 3-6, 6-7(5-7) असा पराभव केला.

Taylor Fritz Broke Rafael Nadal unbeaten streak of 20 Matches
VIDEO: केकेआर 'बादशाह'च्या गाण्यावर पंजाबच्या धडाकेबाज शाहरूखची एन्ट्री

अंतिम सामन्याच्या सुरूवातीलाच 0-4 असा असा पिछाडीवर पडला होता. त्यानंतर नदाल दुखापतीवर उपचार घेण्यासाठी नदाल कोर्टबाहेर गेला. उपचारानंतर नदाल चांगल्या लयीत दिसत होता. मात्र त्याला कॅलिफोर्नियाच्या टेलरने (Taylor Fritz) पहिला सेट काही जिंकू दिला नाही. टेलरने हा सेट 6-3 असा खिशात टाकला.

दुसऱ्या सेटमध्ये झुजार खेळीसाठी ओळखला जाणाऱ्या नदालने कडवा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. त्याने दोन ब्रेक पाँईट मिळवत 5-5 अशी बरोबरी साधली होती. मात्र टेलरने जोरदार पुनरागमन करत टाय ब्रेकरमधील हा सेट जिंकला. या सामन्यात नदालने 34 चुका केल्या तर टेलरने 22 चुका केल्या होत्या.

Taylor Fritz Broke Rafael Nadal unbeaten streak of 20 Matches
लक्ष्यचे 21 वर्षाचा दुष्काळ संपवण्याचे 'टार्गेट' थोडक्यात चुकले

आंद्रे आगासीनंतर टेलर फ्रिट्झ हा इंडियन वेल्स (Indian Wells) जिंकणारा पहिला अमेरिकन खेळाडू ठरला आहे. आंद्रे आगासीने 2001 मध्ये इंडियन वेल्स स्पर्धा जिंकली होती. 2012 मध्ये जॉन इसनेरने इंडियन वेल्सची अंतिम फेरी गाठली होती. मात्र त्याला फायनल जिंकता आली नव्हती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.