Hardik Pandya T20I : हार्दिकच्या नेतृत्वात एकदाही मालिका पराभव न पाहणाऱ्या टीम इंडियासाठी त्रिनिदादमधील सामना असेल खास

Hardik Pandya Team India T20I
Hardik Pandya Team India T20Iesakal
Updated on

Hardik Pandya Team India T20I : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातीली 5 टी 20 सामन्यांची मालिका आजपासून सुरू होत आहे. पहिला वनडे सामना त्रिनिदाद येथे खेळवला जाणार आहे. रोहित आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या करणार आहे. तो भारताचा युवा संघ घेऊन विंडीजला त्यांच्याच मायदेशात आव्हान देण्यासाठी सज्ज झाला आहे.

भारताने नुकतीच तीन वनडे सामन्यांची मालिका 2 - 1 अशी जिंकली. शेवटच्या दोन वनडे सामन्यात हार्दिक पांड्याने संघाचे नेतृत्व केले होते. आता टी 20 मध्ये देखील हार्दिक टीम इंडियाचा विनिंग फॉर्म कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल.

हार्दिक पांड्यासाठी तसेच संपूर्ण टीम इंडियासाठी मालिकेतील पहिला टी 20 सामना हा खूप खास आहे. हा टीम इंडियाचा 200 वा आंतरराष्ट्रीय टी 20 सामना आहे. (Team India 200th T20 Match)

Hardik Pandya Team India T20I
MS Dhoni IPL : स्पॉट फिक्सिंग आयपीएलची काही पाठ सोडेना... धोनी विरूद्ध IPL अधिकारी केसबाबत मोठी अपडेट

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत एकही टी 20 मालिका गमावलेली नाही. वेस्ट इंडीजविरूद्ध देखील आपले हे रेकॉर्ड अबाधित ठेवण्याचा हार्दिक पूरेपूर प्रयत्न करेल. हार्दिकच्या टी 20 संघात यशस्वी जैसवाल, तिलक वर्मा, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग सारखे युवा प्रतिभाशाली खेळाडू आहेत.

टी 20 वर्ल्डकप हा पुढच्या वर्षी जून महिन्यात खेळवण्यात येणार आहे. हा वर्ल्डकप वेस्ट इंडीजमध्येच होणार असून त्याची तयारी करण्यासाठी ही मालिका एक उत्तम संघ आहे. संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव यांना वनडे वर्ल्डकप आणि आशिया कप 2023 पूर्वी आपला फॉर्म सिद्ध करून संघातील जागा निश्चित करण्यासाठी देखील या टी 20 मालिकेची मदत होऊ शकते.

हार्दिक पांड्याने आतापर्यंत 11 टी 20 सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. त्यातील आठ सामने भारताने जिंकले आहेत. ही हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून आशिया उपखंडाबाहेरील दुसरी मालिका आहे. न्यूझीलंडविरूद्धची मालिका त्याची कर्णधार म्हणून पहिली मालिका होती. ही दोन सामन्यांची मालिका 1 - 1 अशी बरोबरीत राहिली होती.

आता वेस्ट इंडीज विरूद्धची मालिका खिशात घालून आपला आशिया खंडाबाहेरील पहिला मालिका विजय साजरा करण्याची संधी आहे. मात्र ही मोहीम काही सोपी नाही कारण संघ सध्या संक्रमणाच्या अवस्थेतून जात आहे आणि विंडीज संघ अनप्रेडिक्टेबल आहे.

Hardik Pandya Team India T20I
MS धोनीच्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील सदस्याचे निधन! अनेक वर्षे केली होती टीम इंडियाची सेवा

भारतीय संघात रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल आणि जसप्रीत बुमराह या सारखे अनुभवी खेळाडू नाहीयेत. त्यामुळे युवा खेळाडूंना हाताशी घेऊन हार्दिकला हे दिव्य पार पाडायचं आहे.

अजित आगरकच्या अध्यक्षतेखालील निवडसमितीने यशस्वी जैसवाल, तिलक वर्मा, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंग यांना संघात स्थान दिले आहे. फक्त अर्शदीप सिंग यापूर्वी आंतरराष्ट्रीय टी 20 सामने खेळला आहे. बाकीचे खेळाडू अजून पदार्पण करायचे आहेत.

मुकेशसाठी विंडीविरूद्धची वनडे आणि यशस्वी जैसावालसाठी कसोटी मालिका चांगली गेली आहे. तिलक वर्माला मुंबई इंडियन्सकडून आयपीएल 2023 मध्ये केलेल्या चांगल्या कामगिरीनंतर भारतीय संघात स्थान मिळाले आहे. त्याने 11 सामन्यात 164 च्या स्ट्राईक रेटने 343 धावा केल्या आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.