Team India: वर्ल्डकपपूर्वी टीम इंडिया मोठ्या संकटात! मॅच विनर्स खेळाडू दुखापतीमुळे बाहेर

दुखापतीचे ग्रहण टीम इंडियाला काय सोडेना
team india 2023 Cricket World Cup
team india 2023 Cricket World Cup sakal
Updated on

Indian Cricket Team : एकदिवसीय विश्वचषक 2023 पुढील वर्षी भारताच्या यजमानपदी होणार आहे. या मोठ्या स्पर्धेपूर्वी इंडियन क्रिकेट टीम संकटात सापडले आहे. नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषकात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता, त्यामुळे 2023 चा वर्ल्ड कप भारतासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. पण भारतीय खेळाडूंच्या दुखापतीची प्रक्रिया संपण्याचे नाव घेत नाही आहे. यावेळीही संघाचे 6 मोठे मॅच विनर खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत, ही बाब संघासाठी एखाद्या समस्येपेक्षा कमी नाही.

team india 2023 Cricket World Cup
FIFA WC: मेस्सीच्या अर्जेंटिनाने आठ वर्षांत दुसऱ्यांदा नेदरलँड्सचे स्वप्न भंगले!

टीम इंडिया सध्या बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातही भारतीय खेळाडूंना सतत दुखापत होत आहे. संघातील सर्वात महत्त्वाचा खेळाडू म्हणजेच कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. रोहित शर्माच्या अंगठ्याला दुखापत झाली असून, ही टीम इंडियासाठी सर्वात मोठी टेन्शन बनली आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर तो बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही बाहेर जाऊ शकतो.

team india 2023 Cricket World Cup
Livakovic : एकटा लिव्हाकोव्हिक भिडला; 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या ब्राझीलला दाखवला घरचा रस्ता

बांगलादेश दौऱ्यात स्टार वेगवान गोलंदाज दीपक चहर आणि कुलदीप सेन यांनाही दुखापत झाली होती. कुलदीप सेन पाठीच्या दुखापतीची झुंज देत आहे, तर दीपक चहरला हॅमस्ट्रिंगमुळे मैदान सोडावे लागले. संघाचा वरिष्ठ तेज मोहम्मद शमी देखील खांद्याच्या दुखापतीमुळे या दौऱ्यावर संघाचा भाग नाही.

team india 2023 Cricket World Cup
Naymar :क्रोएशियाविरूद्ध अखेरच्या क्षणी गोल करत नेमारने पेलेंशी केली बरोबरी

टीम इंडियाचा डॅशिंग अष्टपैलू रवींद्र जडेजा आशिया कप 2022 पासून संघाबाहेर आहे. त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती, तो बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेचा भाग आहे, पण त्याच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह आहे. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही पाठीच्या दुखापतीतून सावरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.