India vs Australia : टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. मालिकेतील तिसरा सामना बारसापारा क्रिकेट स्टेडियम गुवाहाटी येथे झाला. या सामन्यात भारतीय संघाला 5 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला असला तरी ऑस्ट्रेलियन संघाचा एक मोठा विश्वविक्रम मोडला.
तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 222 धावा केल्या. टीम इंडियाने 200 धावांचा टप्पा ओलांडण्याची मालिकेतील ही सलग तिसरी वेळ होती. यासोबतच टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मध्ये सहाव्यांदा 200 प्लस धावा केल्या आहेत. यासह, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका देशाविरुद्ध सर्वाधिक वेळा 200 हून अधिक धावा करणारा संघ बनला आहे.
विशेष म्हणजे टीम इंडियाने टी-20 मध्ये एका देशाविरुद्ध सर्वाधिक वेळा 200 पेक्षा जास्त धावा करण्याच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियन संघाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 5 वेळा न्यूझीलंडविरुद्ध 200 हून अधिक धावा केल्या आहेत. त्याच वेळी दक्षिण आफ्रिकेने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दोन संघांविरुद्ध 5 वेळा 200 हून अधिक धावा केल्या आहेत.
टी-20 मध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक वेळा 200+ धावा
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - 6 वेळा
ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड - 5 वेळा
इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 5 वेळा
दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड - 5 वेळा
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत - 5 वेळा
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 223 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत मोठा विक्रमही केला. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये भारताविरुद्ध सर्वात मोठ्या धावांचा पाठलाग करणारा संघ बनला आहे. यापूर्वी, भारताविरुद्ध सर्वात यशस्वी टी-20 धावांचा पाठलाग दक्षिण आफ्रिकेने केला होता, ज्याने गेल्या वर्षी दिल्लीत 212 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.