IND vs SL: इशान किशनने पहिल्याच सामन्यात केली धवनशी बरोबरी

IND vs SL: इशान किशनने पहिल्याच सामन्यात केली धवनशी बरोबरी धवन नाबाद ८६ तर इशानची ५९ धावांची खेळी
Shikhar-Dhawan-Ishan-Kishan
Shikhar-Dhawan-Ishan-Kishan
Updated on

धवन नाबाद ८६ तर इशानची ५९ धावांची खेळी

कोलंबो: धोकादायक ठरू शकणाऱ्या आव्हानासमोर सहकारी फलंदाज अतिआक्रमक सुरुवात करून बाद होत असताना शिखर धवनने कर्णधाराची जबाबदारी ओळखून संयमी फलंदाजी केली आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतास ७ गडी आणि ८० चेंडू राखून सहज विजयी केले. आपला पदार्पणाचा सामना खेळणारा इशान किशन याने धवनच्या विक्रमाशी बरोबरी केली. आपल्या पहिल्याच वन डे सामन्यात अर्धशतक ठोकणारा इशान केवळ दुसरा भारतीय ठरला. या आधी धवनने ही किमया साधली होती. (India vs Sri Lanka 1 ODI Team India Ishan Kishan only second batsman after Shikhar Dhawan to score fifty on Debut vjb 91)

श्रीलंकेच्या आघाडीच्या सहापैकी पाच फलंदाजांना २५ पेक्षा जास्त धावा केल्यावर अर्धशतक करता आले नाही. डावातील सर्वाधिक धावा आठव्या क्रमांकावरील चमिका करुणारत्ने त्याने केल्या. करुणारत्नेच्या या आक्रमकतेमुळे श्रीलंकेने २६२ धावांचे आव्हान दिले. पृथ्वी शॉ आणि इशान किशनच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे भारताने १७.५ षटकांतच १४३ धावा केल्या होत्या, पण पृथ्वी तसेच इशानने न दाखवलेला संयम धवनने दाखवला आणि तीन अर्धशतकी भागीदारी करीत भारतास विजयी केले.

Shikhar-Dhawan-Ishan-Kishan
IND vs SL 1st ODI: 'मुंबई इंडियन्स'च्या दोघांना पदार्पणाची संधी

पृथ्वी शॉने तडाखेबाज सुरुवात केल्यामुळे भारताचे अर्धशतक ४.५ षटकांत झाले. उंचावरून फटका काहीसा लवकर खेळल्याने तो परतला. इशान किशन शॉच्या तुलनेत कमी आक्रमक होता. त्याच्या खेळीत तुलनेत जास्त संयम होता. तो चपळ झेलामुळे परतला. धवनने या वेळी क्वचितच चूक केली. त्याने शाँसह ५८, इशानसह ८५ आणि मनीष पांडेसह ७२ धावा जोडत भारतास विजयी पथावर नेले. धवन आणि सूर्यकुमार यादवने ४८ धावांची नाबाद भागीदारी करीत भारताचा विजय निश्चित केला.

खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना काहीशी साथ देत होती, पण त्याचा फायदा भारतीय घेऊ शकले नाहीत. सहा गोलंदाजांचा वापर झाला, पण दोघांनीच १० षटके पूर्ण केली. दीपक चहर, युजवेंद्र चहल तसेच कुलदीप यादवने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या, पण या तिघांपेक्षा सर्वाधिक प्रभावी गोलंदाजी कृणाल पंड्याची झाली. भुवनेश्वर तसेच हार्दिक पंड्या अपयशी ठर असताना कृणालने १० षटके मारा करीत केवळ २६ धावाच दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.