IND vs WA: ऑस्ट्रेलियात जाताच गोलंदाज आक्रमक, टीम इंडियाची विजयी सुरुवात

भारताकडून सूर्यकुमार यादव आणि अर्शदीप सिंग यांनी केली चमकदार कामगिरी
India vs Western Australia
India vs Western Australiasakal
Updated on

India vs Western Australia : ऑस्ट्रेलियात 2022 टी-20 विश्वचषक स्पर्धेची तयारी करत आहे. टी-20 विश्वचषक 2022 च्या तयारीत असलेल्या भारतीय संघाने आज पर्थमध्ये वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सराव सामना खेळला. या सामन्यात टीम इंडियाने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा 13 धावांनी पराभव केला. भारताकडून सूर्यकुमार यादव आणि अर्शदीप सिंग यांनी चमकदार कामगिरी केली. टीम इंडियाने प्रथम खेळून 20 षटकात 6 विकेट गमावत 158 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचा संघ निर्धारित षटकांत 8 गडी गमावून केवळ 145 धावा करू शकला.

India vs Western Australia
Womens Asia Cup : भारताने थायलंडचा पराभव करत मारला विजयाचा 'चौकार', 36 चेंडूत जिंकला सामना

रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात केएल राहुल आणि विराट कोहली सहभागी झाले नव्हते. रोहित शर्मा आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत या सामन्यात यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. रोहितने 3 आणि पंतने 9 धावा केल्या. भारताकडून सूर्यकुमारने अवघ्या 35 चेंडूत 52 धावा केल्या. त्याचवेळी हार्दिक पांड्याने महत्त्वपूर्ण 29 धावा केल्या. याशिवाय दीपक हुडाने 22 आणि दिनेश कार्तिकने 19 धावांचे योगदान दिले.

India vs Western Australia
Hardik Pandya Wife Natasha : तुझ्या वाचून करमेना! पांड्या ऑस्ट्रेलियाला जाताच रमला बायकोच्या आठवणीत

159 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाने पॉवरप्लेमध्ये 29 धावा केल्या आणि चार विकेट गमावल्या. भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत भारताला चांगली सुरुवात करून दिली. वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाला यानंतर सामन्यात पुनरागमन करता आले नाही आणि त्यांनी ठराविक अंतराने विकेट्स गमावल्या. हर्षलने शानदार गोलंदाजी करत भारताला 13 धावांनी विजय मिळवून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.