बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२२ मध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला ‘Nona Gaprindashvili Cup’ देऊन सन्मानित करण्यात आले. पण, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ (AICF)च्या कार्यालयातून ही ट्रॉफी गायब झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. ट्रॉफीची शोधा शोध सुरू आहे, परंतु या प्रकारामुळे AICF वर नामुष्की ओढावली आहे.
बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा दोन वर्षातून एकदा आयोजित केली जाते आणि स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संघाला ही ट्रॉफी प्रदान केली जाते. २०२२ मध्ये चेन्नई येथे झालेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने ट्रॉफी जिंकली होती.
बुडापेस्ट येथे चालू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या विजेत्यांना सन्मानित करण्यासाठी काही आठवड्यांपूर्वी जागतिक संघटना FIDE ने AICF ला एक ई मेल पाठवून ट्रॉफी परत करण्याची विनंती केली होती. त्यावेळी AICF प्रशासनाला ट्रॉफी हरवली असल्याचा साक्षात्कार झाला. आता त्यांची ट्रॉफी शोधण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. नवी दिल्ली आणि चेन्नई येथील एआयसीएफ कार्यालयात, तसेच एआयसीएफच्या पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांशी व खेळाडूंशी संपर्क साधमू ट्रॉफीबाबत विचारणा करण्यात येत आहे.
"ट्रॉफी अजूनही सापडलेली नाही. ही ट्रॉफी राष्ट्रीय अभिमानाची बाब असल्याने आम्ही ती शोधण्याचा खूप प्रयत्न करत आहोत. आम्हाला आशा आहे की ट्रॉफी शोधण्यात आम्हाला यश येईल," असे एआयसीएफ सचिव देव ए पटेल यांनी सांगितले.
“पोलिसांनाकडेही तक्रार करण्यात आली आहे. हा विषय देशाच्या प्रतिष्ठेचा आहे. ही आपल्या सर्वांसाठी अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे,” असे एआयसीएफचे उपाध्यक्ष अनिल कुमार म्हणाले.
भारतीय संघ बुडापेस्ट येथे चालू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ स्पर्धेमध्ये खेळत आहे. स्पर्धेतील नवव्या फेरीत उझबेकिस्तानच्या संघाविरूद्धचा सामना २-२ अशा गुणांनी बरोबरीत सुटला. त्यामुळे स्पर्धेमधील भारताच्या विजयी घोडदौडीला ब्रेक लागला आहे. असे असले तरी सुवर्ण पदकाच्या लढतीत भारतीय संघ अजूनही अव्वल स्थानी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.