Team India : ड्रेसिंग रूममधील नवे मानसशास्त्र परिणामकारक! भारतीय संघ व्यवस्थापनाच्या प्रयोगामुळे हलके-फुलके वातावरण

team India dressing room World Cup 2023 new psychology management experiment Ind Vs Nz CWC 23
team India dressing room World Cup 2023 new psychology management experiment Ind Vs Nz CWC 23
Updated on

पुणे, ता. २० : मैदानावरचा खेळ तर होत राहतो, पण 'ड्रेसिंग रुममधील हलके-फुलके वातावरण खेळाडूंची मानसिकता कमालीची उंचावते, हाच धागा पकडून या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत संघव्यवस्थापनाने तयार केलेल्या नव्या मानसशास्त्राचा सकारात्मक परिणाम भारतीय संघाच्या कामगिरीवर होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

सलग चार दणकट विजय मिळवल्याने भारतीय संघाचे मनोबल चांगलेच वाढले आहे. अर्थातच चांगले क्रिकेट सातत्याने खेळल्यानेच हे विजय हाती लागले आहेत. फक्त या चांगल्या खेळामागे नुसती मेहनत नाही, तर अगदी छोट्या-छोट्या मजेदार गोष्टी संघ व्यवस्थापन करत असल्याने त्याचा मोठा फरक पडला आहे.

team India dressing room World Cup 2023 new psychology management experiment Ind Vs Nz CWC 23
NED vs SL : नेदरलँड्‌स श्रीलंकेलाही धक्का देणार? लखनौमध्ये आज दोन्ही संघ आमने-सामने

विश्वचषक मोहीम चालू करताना भारतीय संघ व्यवस्थापनाने आतापर्यंत दोन मजेदार गोष्टी केल्या आहेत. ज्याने खेळाडू फार खूश आहेत. एक म्हणजे प्रत्येक सामन्यातील सर्वोत्तम क्षेत्ररक्षकाला खास पदक देऊन गौरवण्यात येत आहे. चार सामन्यांनंतर चार वेगळ्या खेळाडूंच्या गळ्यात हे मानाचे पदक पडले आहे. पहिले पदक विराट कोहलीने पटकावले होते. त्यावेळी यष्टीरक्षक प्रशिक्षक दिलीप यांनी विराटला पदक प्रदान केले.

नंतर आदल्या वेळचा पदक विजेता नवीन पदक विजेत्या खेळाडूला मानाने पदक देऊ लागला. या एका सकारात्मक स्पर्धेने खेळाडू चांगले क्षेत्ररक्षण करायला अजून मनापासून धंडपडू लागले. खेळाडू कितीही मोठे झाले तरी त्यांच्यातील लहानपण जात नाही. चांगल्या क्षेत्ररक्षकाला पदक देण्याच्या प्रकाराने खेळाडूंच्यातील लहानपण जागे झाले आहे,

team India dressing room World Cup 2023 new psychology management experiment Ind Vs Nz CWC 23
Lasith Malinga : बॉलिंग कोच बदलला...! रोहित शर्माच्या गोलंदाजांना मिळाली धार

ज्याने ड्रेसिंग रुममधला आनंद वाढला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संघात कोण ११ खेळाडू खेळणार हे जाहीर करताना कल्पकता वापरली जायला लागली आहे. संघाची घोषणा ड्रेसिंग रुममधील टीव्हीवर नावे दाखवून केली जाते आणि निवडले गेलेले खेळाडू हसतात आणि ज्यांना संघात जागा मिळत नाही ते खेळाडूही थोडे का होईना हसतात.

याला कारण असे आहे की, नावे जाहीर करताना नावासमोर त्या खेळाडूचा अगदी लहानपणाचा फोटो दाखवला जातोय. त्यामुळे कोणत्या खेळाडूचा कोणता लहानपणीचा फोटो दाखवला जाणार यावरून हास्याचा स्फोट होत असतो. जागा न मिळालेले खेळाडूसुद्धा आपला लहानपणीचा फोटो बघून हसतात. याने संघातील वातावरण हसरे, खेळकर राहायला मोठी मदत होते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.