भारताकडे चीनला मागे टाकत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकण्याची संधी; जाणून घ्या काय आहेत समीकरणे

Indian chess Team: भारतीय संघ बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ स्पर्धेत सुवर्णपद जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे.
indian chess team
indian chess teamesakal
Updated on

Chess Olympiad 2024 final : बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ स्पर्धेत भारतीय संघाची अंतीम फेरी बाकी आहे. १०व्या फेरीत मानांकित यूएसए संघावर भारताने २.५-१.५ अशा फरकाने विजय मिळवला. त्यामुळे १७ गुणांसह दुसऱ्या स्थानावर असलेल्या चीनपेक्षा सुवर्णपदकाच्या शर्यतीत १९ गुणांसह भारत वरचढ ठरला आहे.

भारताने बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२२ मध्ये कांस्यपदक जिंकले होते. आता भारताची अंतीम फेरी बुडापेस्ट येथे ६.३० वाजता स्लोव्हेनियाशी होणार आहे. तर चीन ११व्या फेरीमध्ये यूएसए विरुद्ध खेळेल.

११व्या म्हणजेच अंतीम फेरीनंतर निकाल निश्चित केला जाईल. त्यामुळे कोणत्या समीकरणांमुळे भारताला सुवर्णपदक जिंकणे शक्य होईल आणि चीनच्या पराभवाचा किंवा जिंकण्याचा भारताच्या विजयावर कोणता परिणाम होईल हे जाणून घेऊयात.

indian chess team
भारताची Chess Olympiad स्पर्धेतील मानाची ट्रॉफी चोरीला? AICFच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

जर स्लोव्हेनियाविरुद्ध भारत जिंकला किंवा बरोबरी केली तर चीनच्या पराभवाचा किंवा जिंकण्याचा परिणाम भारतावर होणार नाही. भारत सुवर्णपदक आपल्या नावे करू शकेल. तसेच ४-० अशा फरकाव्यतिरिक्त भारत कोणत्याही फरकाने जर स्लोव्हेनियाकडून हरला, तरीही भारत सुवर्णपदकाचा मानकरी ठरू शकतो. कारण भारत चीनच्या तुलनेत २ गुणांनी आघाडीवर आहे.

जर भारत स्लोव्हेनियाकडून ४-० ने हरला आणि चीनही हरला किंवा चीनची बरोबरी झाली तर टायब्रेक स्कोअरमुळे भारताकडे सुवर्णपदक जिंकण्याची संधी असेल.

याशिवाय चीनला सुवर्णपदक जिंकण्यासाठी आशा करावी लागेल की भारताने स्लोव्हेनियाकडून ४-० अशा फरकाने पराभूत व्हावे आणि चीनने यूएसएला ४-० च्या फरकाने पराभूत करावे, तरच चीनला सुवर्णपदक मिळू शकते.

एकंदरीत वरील नमूद केलेली समीकरणे पाहता भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्यास अनुकूल परिस्थिती आहे. तर भारताच्या तुलनेत चीनची शक्यता कमी आहे. त्यामुळे बुडापेस्ट येथे भारताला ऐतिहासिक विजय मिळवायची संधी आहे.

indian chess team
भारतीय कबड्डी संघटनेवर बंदीची कारवाई; जागतिक स्पर्धेत खेळता येणार नाही

बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२२

बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२२ स्पर्धा चेन्नई येथे आयोजित करण्यात आली होती. यजमान भारतीय संघाला स्पर्धेमध्ये एकूण ३ संघ सहभागी करण्याची संधी मिळाली होती. या स्पर्धेत भारतातील नव्या खेळाडूंच्या भारत-ब संघाने कांस्यपदक जिंकले होते. भारत-ब संघामध्ये गुकेश, निहाल, प्रज्ञाननंदा, अधीबन, रौनक या नव्या खेळाडूंचा समावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.