Asia Cup 2022 : मुखी ‘ऑल इज वेल’ पण चेहरा ‘नॉट वेल’, सलग दोन पराभवानंतर रोहितची अवस्था

अफगाणिस्तान विरुद्ध नसीम शाहच्या दोन षटकारांनी टीम इंडिया बाहेर
team india asia cup 2022
team india asia cup 2022sakal
Updated on

दुबई, ता. ७ ः ‘‘संघात काही कमतरता नाही... संघ चांगलाच आहे... फक्त दडपणाखाली खेळता याला हवे,’’ सुपर फोर फेरीतील सलग दुसरा सामना गमावल्यावरही भारतीय कप्तान रोहित शर्मा ‘ऑल इज वेल’ चे गाणे गात होता. पाकिस्तानपाठोपाठ श्रीलंकेविरुद्धचा सामना गमावल्यावर भारतीय खेळाडूंच्या चेहऱ्यावरची निराशा लपत नव्हती. मैदानाबाहेर भारतीय क्रिकेटचे चाहते संघाचे अपयश पचवताना झगडत होते.

team india asia cup 2022
PAK vs AFG : झुंजार अफगाणींनी 130 धावातही पाकला रडवले, अखेर नसीम शाह आडवा आला

‘‘गेल्या दोन सामन्यांत अपयश आले हे मान्य आहे. पहिल्या सहा षटकांत आम्हाला जास्त धावा जमा करता आल्या नाहीत आणि माझी आणि सूर्याची भागीदारी झाल्यावर शेवटच्या ७-८ षटकांत तयार झालेल्या पायावर चांगली अजून थोडी मोठी धावसंख्या उभारता अली असती. त्यातून त्यांच्या सलामीच्या जोडीने खूपच चांगली सुरुवात करून दिली, ज्याचा परिणाम सामन्याच्या निकालावर झाला. मी शेवटी म्हणेन की, आम्ही १०-१५ धावा कमी केल्या आणि १७३ धावाही कमी नव्हत्या, त्याची राखण करतानाही आम्ही थोडे कमी पडलो,’’ असेही रोहितने सांगितले.

team india asia cup 2022
Asif Ali-Fareed Ahmad Fight : मैदानातच भिडले पाक-अफगान खेळाडू, मारण्यासाठी उचलली बॅट

दोन देशांतील मालिकेत चांगली कामगिरी करणारी भारतीय टीम वर्ल्ड कप, आशिया कप स्पर्धेत गरजेच्यावेळी योग्य कामगिरी करत नाही, असे म्हटल्यावर रोहित थोडा नाराज झाला. ‘‘महत्त्वाच्या सामन्यात योग्य खेळ झाला नाही की टीका होणार याची मला कल्पना आहे. त्याने संघातील वातावरण कधी बदलत नाही. आताही तुम्ही आत जाऊन बघितलेत तर संघातील वातावरण खेळीमेळीचे आणि आनंदाचे असेल आणि ते असे राहावे म्हणून आम्ही प्रयत्न केले आहेत. आम्हाला खात्री आहे की, चांगले वातावरण असल्याचा योग्य परिणाम मोठ्या स्पर्धेत दिसून येईल. फक्त आम्हाला दडपणाखाली खेळता यायला हवे आणि सर्वोत्तम कामगिरी करायची हिम्मत ठेवावी लागेल,’’ असा विश्वास रोहित शर्माने दाखवला.

पत्रकार परिषदेत बोलताना दोन पराभवांनी आलेली निराशा लपवण्याचा कप्तान रोहित शर्माने प्रयत्न केला. प्रत्यक्षात वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर येऊन ठेपलेली असताना मोक्याच्या स्पर्धेत, मोक्याच्या क्षणी योग्य कामगिरी करता न आल्याचे दुःख खेळाडूंकरिता आणि संघ व्यवस्थापनाकरिता किती मोठे आहे याची कल्पना न केलेलीच बरी.

team india asia cup 2022
VIDEO : अफगाणिस्तानच्या चाहत्यांचे लाजिरवाणे कृत्य, हरल्यानंतर पाकच्या चाहत्यांना मारहाण

वर्ल्डकपसाठी ९५ टक्के संघ निश्चित

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेसाठी ९५ टक्के संघ निश्चित आहे. काही जागांसाठी शर्यत आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ कधी जाहीर करणार हे मला माहिती नाही, पण आगामी मालिकांतून आम्ही उर्वरित खेळाडू निश्चित करू. आशिया करंडक स्पर्धेतील कामगिरीचा विश्वकरंडक स्पर्धेच्या मोहिमेवर परिणाम होणार नाही, असे रोहित शर्मा म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.