WI vs IND 3rd ODI: रोहित-विराटच्या पुनरागमनामुळे भारतीय इलेव्हनचे बदले समीकरण, सूर्या अन् संजू बाहेर?

rohit sharma ind vs wi odi
rohit sharma ind vs wi odi
Updated on

WI vs IND 3rd ODI Playing 11 : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेतील तिसरा एकदिवसीय सामना ब्रायन लारा स्टेडियमवर आज खेळवला जाणार आहे. मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. दुसरी वनडे जिंकून वेस्ट इंडिजने भारतीय संघाला विचार करायला भाग पाडले आहे. खरे तर दुसऱ्या वनडेत भारतीय संघात आश्चर्यकारक बदल करण्यात आले होते.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली. पण कोहली आणि रोहितच्या जागी प्लेईंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केलेले खेळाडू अपेक्षेप्रमाणे खेळू शकले नाहीत, त्यामुळे आता निर्णायक वनडेतही कोणते प्रयोग केले जाणार हा प्रश्न आहे. तसे, तिसऱ्या वनडेत रोहित आणि कोहली परतले तर प्लेइंग इलेव्हनमधून कोणाला वगळले जाईल. हा प्रश्न सर्वांसमोर आहे.

rohit sharma ind vs wi odi
Moeen Ali Retirement : 'कर्णधारने मला आता मेसेज केला तर...' मोईन अलीने पुन्हा ठोकला कसोटी क्रिकेटला रामराम

दुसऱ्या वनडेत संजू सॅमसनने नाराज केले. अशा स्थितीत कोहलीच्या पुनरागमनामुळे सॅमसनला पुन्हा एकदा प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे. कारण इशान किशनने दुसऱ्या वनडेत अर्धशतक ठोकले होते आणि तो सध्या चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे.

त्याचवेळी रोहितच्या आगमनामुळे अक्षर पटेलची एक्झिट निश्चित असल्याचे मानले जात आहे. सूर्यकुमार यादवनेही दोन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये काही विशेष कामगिरी केली नसली तरी सूर्याला प्रशिक्षक आणि कर्णधाराचा पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत सूर्या तिसर्‍या वनडेत भारतीय इलेव्हनचा भाग असेल अशी अपेक्षा आहे.

rohit sharma ind vs wi odi
WI squad T20 vs IND : टी-20 मालिकेसाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा! 'या' दिग्गज खेळाडूंची संघात एन्ट्री

तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात संजूला आणखी एक संधी दिल्यास निश्चितच सूर्यकुमार यादवला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते. ज्याची शक्यता कमी आहे. मात्र, सूर्यकुमार पन्नास षटकांच्या फॉरमॅटमध्ये संघर्ष करताना दिसत आहे. दुसरीकडे, सॅमसन अनेक पुनरागमन करूनही छाप पाडू शकला नाही.

तिसऱ्या वनडेत उमरान मलिकच्या जागी जयदेव उनादकटला संधी मिळू शकते. या वनडे मालिकेत जयदेवला अद्याप संधी मिळालेली नाही. अशा स्थितीत उमरानऐवजी उनादकटवर तिसऱ्या वनडेत डाव लावण्याची शक्यता आहे. खरे तर, प्रशिक्षकाने आधीच सूचित केले आहे की, एकदिवसीय मालिकेत आणि टी-20 मालिकेत नवीन खेळाडूंचा प्रयत्न केला जाईल.

भारतीय संभाव्य इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव/संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट/उमरान मलिक, शार्दुल ठाकूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.