IND vs ENG : शार्दुलच्या जागी कुणाला संधी, ईशांत की अश्विन?

IND vs ENG : शार्दुलच्या जागी कुणाला संधी, ईशांत की अश्विन?
Updated on

IND vs ENG : क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या लॉर्ड्सवर आज भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू होत आहे. शार्दुल ठाकूर जखमी झाल्यामुळे त्याच्या ठिकाणी अश्विनच्या नावाची चर्चा होती, परंतु वेगवान गोलंदाजाला संधी दिली जाईल असे विराटने स्पष्ट केले. मात्र विराट कोहलीच्या संघाला फलंदाजीत मोठी सुधारणा करावी लागणार आहे. त्यामुळे शार्दुलच्या जागी कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. इशांत शर्मा की अश्विन, नेमकी कुणाला संधी मिळणार? याचं कोडं सामन्यावेळीच सुटेल.

अखेरच्या दिवशी पावसामुळे पहिल्या कसोटीचा अंतिम दिवसाचा खेळ वाया गेला. भारताला १५७ धावांची गरज होती; तर इंग्लंडला नऊ विकेटची. विजयाची अधिक संधी भारताला होती, परंतु फलंदाजीबाबत झाकली मूठ सव्वा लाखाचीच राहिली होती. हा बोध घेत संघातील मधल्या फळीच्या फलंदाजांना जबाबदारी पार पाडावीच लागणार आहे. त्यासाठी चेतेश्वर पुजारा, स्वतः विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांना धावा कराव्याच लागणार आहेत. लॉर्डसच्या खेळपट्टीचे स्वरूप पाहूनच निर्णय घेतला जाईल. विराटने जर चार वेगवान गोलंदाजांच्या रचनेला प्राधान्य दिले, तर ईशांत शर्मा किंवा उमेश यादव संघात येतील. ४+१ या रचनेने आम्ही दुसऱ्या कसोटीत खेळू, असे सूचक विधान कोहलीने पहिल्या कसोटीनंतर केले होते.

IND vs ENG : शार्दुलच्या जागी कुणाला संधी, ईशांत की अश्विन?
श्रेयस तळपदे विरोधात चोरीचा आरोप, पोलिसांत तक्रार

भारताचा संभावित संघ -

रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह

IND vs ENG : शार्दुलच्या जागी कुणाला संधी, ईशांत की अश्विन?
UGC च्या NET परीक्षेची तारीख जाहीर, पाहा डिटेल्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.