Team India : बुमराह अन् रोहितमुळे दिलासा मात्र, हर्षलचा गंडलेला फॉर्म अजूनही चिंतेचे कारण

रोहित शर्मा-जसप्रीत बुमराह फॉर्ममध्ये दिलासादायक; हर्षल पटेलमुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली
Team India
Team India
Updated on

नागपूर मधील स्टेडियमवर शुक्रवारी ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारताने तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत पुनरागमन केले आहे. पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. आठ-आठ षटकांच्या या सामन्यात टीम इंडियासाठी अनेक गोष्टी चांगल्या झाल्या तर अनेक वाईटही झाल्या. अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पुनरागमन केले. कर्णधार रोहित शर्मा आपल्या जुन्या फॉर्ममध्ये परतला. त्याचबरोबर काही खेळाडूंच्या कामगिरीनेही संघाची चिंता वाढवली.

सामन्यात काय घडलं -

टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने आठ षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 90 धावा केल्या. मॅथ्यू वेडने सर्वाधिक 43 धावांची नाबाद खेळी खेळली. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक दोन बळी घेतले.

प्रत्युत्तरात भारताने 7.2 षटकांत चार गडी गमावून लक्ष्याचा पाठलाग केला. रोहितने 20 चेंडूत नाबाद 46 धावांची नाबाद खेळी खेळली. दिनेश कार्तिकने 2 चेंडूत 10 धावा करून सामना जिंकून दिला.

रोहित शर्माचे फॉर्ममध्ये तर जसप्रीत बुमराहचे पुनरागमन भारतासाठी दिलासादायक -

भारतीय कर्णधार रोहित शर्माने काल ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यावरून असे वाटत होत की, तो जुन्या शैलीत परत आला आहे. रोहितने स्फोटक खेळी करत चार चौकारांसह चार षटकारही ठोकले. 20 चेंडूत 46 धावांच्या नाबाद खेळीत त्याचा स्ट्राइक रेट 230.00 होता. तब्बल सात-आठ महिन्यांनंतर त्याने अशी फलंदाजी केली आहे. विश्वचषकापूर्वी भारतीय संघासाठी हे चांगले संकेत आहेत.

भारताचा सर्वात महत्त्वाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने या सामन्यात पुनरागमन केले. त्याने दोन षटकांत 23 धावा दिल्या. इतक्या धावा देऊनही बुमराहने आपल्या यॉर्करने प्रभावित केले. कालच्या सामन्यात कांगारूंचा कर्णधार फिंचचा अशाच एका यॉर्करवर क्लीन बोल्ड केला. यामुळे बुमराहचा फॉर्म खराब नाही यावर लोकांचा विश्वास बसला. आणखी दोन सामने खेळल्यानंतर तो पूर्णपणे लय मिळवेल.

हर्षल पटेलमुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली -

नागपूर मध्ये खेळला गेलेला दुसरा टी-20 सामन्यात हर्षल पटेल सर्वात महागडे ठरला. त्याने दोन षटकांत 32 धावा दिल्या. आयपीएलमध्ये डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध झालेला हर्षल दुखापतीतून परतल्यानंतर लय मध्ये दिसत नाही. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पुनरागमन करताना दोन्ही सामन्यात त्याला यॉर्कर नीट टाकता आला नाही. त्याला टी-20 विश्वचषक संघात स्थान देण्यात आले असून तो संघाचा डेथ ओव्हर स्पेशालिस्ट आहे. अशा परिस्थितीत हर्षलला लवकरच फॉर्ममध्ये परतावे लागणार आहे. नाहीतर टीम इंडियाची डोकेदुखी अजूनच वाढेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()