Team India : आशिया कपपूर्वीच टीम इंडिया अडचणीत, हा दिग्गज खेळाडू वर्ल्डकपमधूनही बाहेर?

Team India
Team Indiasakal
Updated on

Team India : भारतीय क्रिकेट संघ गेल्या जवळपास वर्षभरापासून आपल्या स्टार खेळाडूंच्या दुखापतीच्या समस्येने त्रस्त आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषकादरम्यान संघाला जसप्रीत बुमराहशिवाय मैदानात उतरावे लागले होते. त्याचबरोबर टीम इंडियाचे दोन स्टार खेळाडू यंदाच्या आशिया कपमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

याशिवाय 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठीही टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 पासून मैदानाबाहेर असलेला एक स्टार खेळाडू आता विश्वचषक स्पर्धेत न खेळल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत.

Team India
WI vs IND: टी-20 वर्ल्डकपची रंगीत तालीम! भारत-वेस्ट इंडीज यांच्यामध्ये आजपासून पाच सामन्यांचा थरार

टीम इंडियाचा सीनियर खेळाडू केएल राहुल पाकिस्तान-श्रीलंकामध्ये होणाऱ्या आशिया कपमध्ये खेळणार नसण्याची शक्यता आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला आणखी वेळ लागेल. विश्वचषक स्पर्धेतील सहभागाचा प्रश्न आहे, तर श्रेयस अय्यर ही बाहेर जाऊ शकतो, ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे.

राहुलच्या मांडीवर शस्त्रक्रिया करण्यात आली, तर अय्यरने पाठीच्या खालच्या भागावर शस्त्रक्रिया केली आहे. बीसीसीआयने खेळाडूंच्या दुखापतीच्या अपडेटबाबत नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात या दोघांच्या पुनरागमनाबद्दल कोणताही उल्लेख नाही.

Team India
Hockey Asian Champions Trophy: आशियाई क्रीडा स्पर्धेची आजपासून चेन्नईत तयारी! भारत-चीनमध्ये सलामी

अय्यरही वर्ल्डकपमधून बाहेर ?

दरम्यान, बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, राहुल आणि श्रेयस हे दोघेही 50 षटकांच्या क्रिकेटसाठी आणि तेही दमट श्रीलंकेच्या परिस्थितीत जुळतील अशी शक्यता कमी आहे. पण विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेपूर्वी राहुल किमान तंदुरुस्त होऊ शकतो, असे बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाला वाटते.

त्याच वेळी, बीसीसीआयच्या सूत्राने अय्यरबद्दल काहीही सांगितले नाही. राहुल विश्वचषकापर्यंत पुनरागमन करू शकतो, पण श्रेयस अय्यरबाबत काहीही सांगता येणार नाही, हे त्याच्या विधानावरून स्पष्ट झाले. अशा स्थितीत टीम इंडियाच्या नंबर 4 बाबत अडचणी वाढू शकतात.

Team India
Hockey India : हॉकी इंडियासाठी एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदक फार महत्वाचं; नाही तर गाठावं लागेल पाकिस्तान

चौथ्या क्रमांकावर कोण करणार फलंदाजी?

गेल्या काही वर्षांपासून श्रेयस अय्यर वनडे क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी नंबर 4 फलंदाज करत आहे. अय्यर भारतीय संघासाठी तंदुरुस्त नसेल तर चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार हा सर्वात मोठा प्रश्न आहे. किंबहुना, नुकत्याच झालेल्या मालिकेत संजू सॅमसनला त्या स्थानावर आजमावले गेले, त्यानेही धडाकेबाज अर्धशतक झळकावले. याआधीही तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे.

दुसरीकडे, सूर्यकुमार यादवला गेल्या काही महिन्यांत या स्थानावर सातत्याने संधी मिळाल्या आहेत, परंतु प्रभावित करण्यात तो अपयशी ठरला आहे. अशा परिस्थितीत ही जबाबदारी कोण सांभाळणार, सॅमसन की सूर्या, हा मोठा प्रश्न संघ व्यवस्थापनासमोर आहे आणि त्याचे उत्तर त्यांना लवकरच शोधावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()