IND vs NZ: वनडेत द्विशतक ठोकणाऱ्या 'या' पांड्याच्या लाडक्या खेळाडूची T20 कारकीर्द धोक्यात?

या दिग्गज खेळाडूंनी एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावले, परंतु टी-20 फॉरमॅटमध्ये त्याला अद्याप छाप पाडता आली नाही...
Team India shubman gill T20 career end poor performance ind vs nz 1st t20 cricket news
Team India shubman gill T20 career end poor performance ind vs nz 1st t20 cricket news
Updated on

Ind VS NZ 1st T20 Match: टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. या सामन्यात भारतीय फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली. वॉशिंग्टन सुंदरशिवाय कोणताही खेळाडू आपली छाप सोडू शकला नाही. टीम इंडियाचा एक युवा खेळाडू या सामन्यात पूर्णपणे फ्लॉप ठरला. हा खेळाडू अद्याप टी-20 फॉरमॅटमध्ये त्याच्या खेळानुसार कामगिरी करू शकलेला नाही.

Team India shubman gill T20 career end poor performance ind vs nz 1st t20 cricket news
IND vs NZ: 'इतके कॉल अन् मेसेज की मोबाईल...', पृथ्वी झाला भावूक

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात शुभमन गिल आणि इशान किशनला सलामीवीर म्हणून संघात संधी मिळाली. या सामन्यात हे दोन्ही खेळाडू संघाला चांगली सुरुवात करण्यात अपयशी ठरले. शुभमन गिलच्या टी-20 कारकिर्दीतील हा चौथा सामना होता. या सामन्यातही गिल आपल्या बॅटने अप्रतिम कामगिरी करू शकला नाही.

शुभमन गिलने पहिल्या टी-20 सामन्यात 6 चेंडूंचा सामना करताना केवळ 7 धावा केल्या. या इनिंगमध्ये त्याच्या बॅटमधून 1 चौकार दिसला. शुभमन गिलने आतापर्यंत 4 सामन्यांत 16.25 च्या सरासरीने केवळ 65 धावा केल्या आहेत. नुकतेच त्याने न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात द्विशतक झळकावले, परंतु टी-20 फॉरमॅटमध्ये त्याला अद्याप छाप पाडता आलेली नाही.

Team India shubman gill T20 career end poor performance ind vs nz 1st t20 cricket news
Ind vs NZ: नो बॉल 'किंग' अर्शदीप सिंग! शेवटच्या षटकात दिल्या 27 धावा; रैनाला ही टाकले मागे

या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावून 176 धावा केल्या. न्यूझीलंडकडून डॅरेल मिशेलने सर्वाधिक 59 धावा केल्या. भारताकडून वॉशिंग्टन सुंदर हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 2 विकेट घेतल्या. टीम इंडियाला मॅच जिंकण्यासाठी 177 रन्सचं टार्गेट दिलं, पण प्रत्युत्तरात टीम इंडियाला 20 ओव्हरमध्ये 9 गडी गमावून 155 धावा करता आल्या. टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक 50 धावा केल्या. त्याचवेळी सूर्यकुमार यादवने 47 धावांची खेळी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.