Ind vs Eng : BCCI ने शेवटच्या 3 कसोटी सामन्यांसाठी केली टीम इंडियाची घोषणा! कोहली मालिकेतून बाहेर, 'या' नवीन खेळाडूला मिळाली संधी

बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटींसाठी केली टीम इंडियाची घोषणा...!
India squad for next 3 England Tests announced marathi news
India squad for next 3 England Tests announced marathi news
Updated on

India squad for next 3 England Tests announced : बीसीसीआयने इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. नवीन खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे. तर केएल राहुल आणि रवींद्र जडेजा संघात परतले आहेत. याशिवाय विराट कोहलीने आपले नाव मागे घेतले आहे.

India squad for next 3 England Tests announced marathi news
Ranji Trophy : पृथ्वी शॉचा हल्लाबोल...! गुडघ्याच्या दुखापतीनंतर जोरदार पुनरागमन; कर्णधार रहाणे पुन्हा फेल

बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, वैयक्तिक कारणांमुळे विराट कोहली मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये निवडीसाठी उपलब्ध होणार नाही. बोर्ड कोहलीच्या निर्णयाचा पूर्ण आदर करतो. रवींद्र जडेजा आणि केएल राहुल यांची संघात निवड करण्यात आली आहे. पण ते खेळणार का नाही हे अजुन निश्चित नाही. बोर्डाने माहिती दिली की जडेजा आणि केएल राहुल यांना बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने मॅच फिट घोषित केल्यावरच त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळेल.

India squad for next 3 England Tests announced marathi news
U19 World Cup Final : बुमराहकडून मिळाल्या टिप्स, खतरनाक 'यॉर्कर' टाकणारा नमन तिवारी आहे तरी कोण?

बीसीसीआयने शेवटच्या तीन कसोटींसाठी 17 सदस्यीय टीम इंडियाची घोषणा केली आहे. वेगवान गोलंदाजीमध्ये उपकर्णधार जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मुकेश कुमार यांच्यासह युवा आकाश दीपचाही संघात समावेश करण्यात आला आहे. फिरकी विभागात रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्यासह वॉशिंग्टन सुंदरलाही स्थान मिळाले आहे.

इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या तीन कसोटींसाठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल, रजत पाटीदार, सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक) , रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आकाश दीप.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारी 2024 रोजी राजकोट येथे सुरू होईल, तर चौथा कसोटी सामना 23 फेब्रुवारी 2024 रोजी रांची येथे सुरू होईल. मालिकेतील पाचवी आणि शेवटची कसोटी 07 मार्च 2024 पासून धरमशाला येथे खेळली जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()