Team India Suryakumar Yadav : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडिज दौऱ्याने एका नव्या पर्वाची सुरुवात करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-20 सामने खेळणार आहे.
पण या दौऱ्यातील सर्वात महत्त्वाची एकदिवसीय मालिका असणार आहे. कारण टीम इंडियासाठी ही मालिका आशिया चषक आणि विश्वचषकाच्या दृष्टिकोनातून महत्वाची आहे. त्याचबरोबर टीम इंडियाच्या खेळाडूची वनडे कारकीर्दही या मालिकेतून ठरवली जाणार आहे.
टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव टी-20 फॉरमॅटमध्ये धुमाकुळ घालत आहे. पण या खेळाडूला आतापर्यंत वनडे फॉरमॅटमध्ये तेवढी चांगली कामगिरी करता आलेली नाही. श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत सूर्याला वनडे फॉरमॅटमध्ये सतत संधी मिळाल्या, पण त्याचा फायदा उठवण्यात तो अपयशी ठरला.
सूर्याने आपल्या कारकिर्दीत 23 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून एकूण 433 धावा निघाल्या. यादरम्यान सूर्याची सरासरी केवळ 24 होती आणि त्याला केवळ 2 अर्धशतके झळकावता आली.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत सूर्यकुमार यादवलाही संधी देण्यात आली होती. या मालिकेत सूर्याला स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी होती. मात्र त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे सूर्याला संघात संधी देण्यात आली होती.
या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. दोन्ही सामन्यात मिचेल स्टार्कने त्याला पहिल्याच चेंडूवर माघारी पाठवले. मात्र या दोन्ही सामन्यांमध्ये अपयश आल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने त्याला 7व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात पाठवले. येथेही सूर्या पहिल्याच चेंडूवर माघारी परतला.
वेस्ट इंडिज दौरा शेवटची संधी!
सूर्यकुमार यादवसाठी वेस्ट इंडिज दौरा ही शेवटची संधी असू शकते. कारण श्रेयस अय्यर आशिया कपसह संघात परतत आहे. अशा स्थितीत सूर्याकडे वेस्ट इंडिज दौऱ्यावर स्वत:ला सिद्ध करण्याची शेवटची संधी आहे. या मालिकेतही तो चांगली कामगिरी करू शकला नाही तर त्याला आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेत संधी मिळणे कठीण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.