Wi vs Ind T20 Squad: BCCI ने 'या' खेळाडूंची टी-20 कारकीर्द संपवली! वेस्ट इंडिज दौऱ्यातून अचानक दिला डच्चू

Wi vs Ind T20 Squad
Wi vs Ind T20 Squad
Updated on

Wi vs Ind T20 Squad : भारतीय संघाचे अनुभवी व दिग्गज खेळाडू विराट कोहली व रोहित शर्मा यांना टी-२० संघातून बाहेरच ठेवण्यात आले आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी पार पडलेल्या पुरुषांच्या वरिष्ठ निवड समितीच्या बैठकीत वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली. या संघातून विराट व रोहितला वगळण्यात आले. मुंबई इंडियन्सचा मधल्या फळीतील फलंदाज तिलक वर्माला पहिल्यांदाच भारतीय संघात संधी देण्यात आली आहे.

Wi vs Ind T20 Squad
WI vs IND India's T20I squad : तिलक वर्मा, यशस्वी जैसवालला लागली टी 20 ची लॉटरी; रिंकू सिंहकडे केलं दुर्लक्ष

भारत - वेस्ट इंडीज यांच्यामध्ये तीन ऑगस्टपासून पाच टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी हार्दिक पंड्याकडे भारतीय टी-२० संघाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे. सूर्यकुमार यादव या संघाचा उपकर्णधार असणार आहे. इशान किशन व संजू सॅमसन या दोन यष्टिरक्षक फलंदाजांची निवड करण्यात आली आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेत निवडण्यात आलेल्या यशस्वी जयस्वाललाही संघात स्थान देण्यात आले आहे.

भारतीय संघात फिरकी गोलंदाज रवी बिश्‍नोई आणि वेगवान गोलंदाज आवेश खान याचे पुनरागमन झालेले आहे. अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव व रवी बिश्‍नोई यांच्या खांद्यावर फिरकी गोलंदाजीची जबाबदारी असणार आहे. रवींद्र जडेजाला विश्रांती देण्यात आली आहे. अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान व मुकेश कुमार हे वेगवान गोलंदाज संघात नसतील.

Wi vs Ind T20 Squad
Wimbledon 2023 : 'जस्ट स्टॉप ऑईल'वाल्यांनी विंबल्डनमध्येही केला राडा; सामना थांबला

भारताचा संघ मागील टी-२० मालिका न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. या मालिकेतील काही खेळाडूंना यंदा संघात स्थान देण्यात आलेले नाही. जितेश शर्मा, पृथ्वी शॉ, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा व वॉशिंग्टन सुंदर यांची निवड करण्यात आलेली नाही. आयपीएल गाजवणारा रिंकू सिंग याच्या नावाचीही चर्चा रंगू लागली होती; पण तो मधल्या फळीत फलंदाजी करतो. सध्या भारताकडे मधल्या फळीत खेळणारे फलंदाज असल्यामुळे त्याला भारताच्या या संघात स्थान दिले नसावे. ॠतुराज गायकवाड व शार्दुल ठाकूर यांचाही समावेश करण्यात आलेला नाही.

Wi vs Ind T20 Squad
Virat Kohli Jonny Bairstow : बेअरस्टोची आता सटकली! रूट म्हणतो, ऑस्ट्रेलियाने विराटसारखी चूक केली आता...

दुखापतग्रस्त खेळाडू नाहीच

जसप्रीत बुमरा, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल या दुखापतग्रस्त खेळाडूंचे पुनरागमन झालेले नाहीच. मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांना विश्रांती देण्यात आलेली आहे.

भारताचा टी-२० संघ ः इशान किशन (यष्टिरक्षक), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्‍नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.

टी-20 मालिकेचे वेळापत्रक

  • पहिला सामना - ३ ऑगस्ट, त्रिनिदाद

  • दुसरा सामना - ६ ऑगस्ट, गयाना

  • तिसरा सामना - ८ ऑगस्ट, गयाना

  • चौथा सामना - १२ ऑगस्ट, फ्लोरिडा

  • पाचवा सामना - १३ ऑगस्ट, फ्लोरिडा

    (सर्व सामने भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होतील.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.