T20 World Cup : अर्शदीप सिंग-दीपक चहरने सीनियर्सचे वाढवले टेन्शन, केला मोठा दावा!

विजयाचा हिरो ठरला अर्शदीप सिंगने आफ्रिकन फलंदाजीचे कंबरडे मोडले
team india t20 world cup
team india t20 world cup sakal
Updated on

T20 World Cup Team India : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात 8 गडी राखून मोठा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 106 धावा केल्या, प्रत्युत्तरात टीम इंडियाने हे लक्ष्य केवळ 2 विकेट गमावून पूर्ण केले. वरिष्ठ गोलंदाजांच्या अनुपस्थितीत अर्शदीप सिंग आणि दीपक चहर यांनी अप्रतिम गोलंदाजीचे दर्शन करत आफ्रिकन फलंदाजीचे कंबरडे मोडले. दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ अवघ्या 9 धावांवर बाद झाला. दोघांच्या अप्रतिम गोलंदाजीनंतर आता टी-20 विश्वचषकापूर्वी सीनियर्सचे टेन्शनही वाढले आहे.

team india t20 world cup
IND vs SA : अर्शदीप-दीपकची घातक गोलंदाजी, सुर्याची विक्रमी कामगिरी, विजयाची 5 प्रमुख कारणे

T20 वर्ल्ड कप मध्ये अर्शदीप सिंग टीम इंडियाच्या संघाचा एक भाग आहे. आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजीनंतर अर्शदीपने टीम इंडियात स्थान मिळवले आहे, तेव्हापासून त्याची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. अशा परिस्थितीत टी-20 विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवण्यात तो यशस्वी ठरला आहे.

दुसरीकडे दीपक चहर दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे. त्यानंतर त्याने काही सामने खेळले आहे. अशा परिस्थितीत तो स्टँडबायचा भाग आहे, परंतु टीम इंडियासह ऑस्ट्रेलियाला जाईल, जर गोलंदाज जखमी झाला तर दीपक बॅकअप म्हणून काम करू शकेल.

team india t20 world cup
Rohit Sharma : टीम इंडिया सहज जिंकली, मग रोहित शर्माला चिंता कशाची?

टी-20 विश्वचषकात भारताच्या आशा जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल यांसारख्या गोलंदाजांकडून आहेत. जे सतत टीम इंडियाचा भाग आहेत. परंतु भुवनेश्वर कुमारसाठी मागील काही सामने चांगले गेले नाहीत, तर जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल दुखापतीतून पुनरागमन करत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन्ही गोलंदाज चांगलेच महागडे ठरले, अशा परिस्थितीत टी-20 विश्वचषकात जाण्यापूर्वी फॉर्ममध्ये फरक पडला, तर मोठे बदल पाहायला मिळू शकतात.

team india t20 world cup
Ajinkya Rahane : शेष भारत संघाकरिता रहाणेचा विचार नाही

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकांत 8 गडी गमावून 106 धावा केल्या. केशव महाराज यांनी सर्वाधिक 41 धावांची खेळी खेळली. त्याचवेळी अर्शदीप सिंगने तीन विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात भारताने लक्ष्याचा पाठलाग 16.4 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात केला. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.