Virat Kohli Shubman Gill : कसोटीत विराटच्या पर्यायाची शोधमोहीम सुरू... गिलबाबत संघ व्यवस्थापनाचा विशेष प्लॅन?

Virat Kohli Test Cricket Replacement Shubman Gill
Virat Kohli Test Cricket Replacement Shubman Gill esakal
Updated on

Virat Kohli Test Cricket Replacement Shubman Gill : भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभव झाला. यानंतर भारतीय कसोटी संघात मोठे बदल करण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. आता भारतीय संघ जुलै महिन्यात वेस्ट इंडीज दौऱ्यावर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. पुढचे WTC सर्कल हे 2025 पर्यंत संपुष्टात येणार आहे. तोपर्यंत भारतीय संघातील जवळपास निम्मे खेळाडू हे वयाची पस्तीशी ओलांडून गेले असतील.

रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन हे 38 वर्षाचे झाले असतील. तर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे 37 वर्षांचे झालेले असतील. विराट कोहली आणि रविंद्र जडेजाने देखील 36 वय पार केलं असेल. मोहम्मद शमी देखील 34 वर्षाचा झाला असेल. त्यामुळे भारतीय संघाला यांच्या पर्याय शोधून ठेवावाच लागणार आहे.

Virat Kohli Test Cricket Replacement Shubman Gill
World Cup 2023 Schedule : अहमदाबादनंतर आता चेन्नईतूनही सामना हलवा... पाकिस्तान जाम घाबरलंय

कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजीच्या क्रमवारीत सर्वात महत्वाची जागा ही चौथ्या क्रमांकाची असते. सध्या या जागेवर विराट कोहली खेळतोय. त्याच्या आधी सचिन तेंडुलकर या क्रमांकावर फलंदाजी करायचा. सचिनंतर विराटने चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून दमदार कामगिरी केली आहे. मात्र कोहलीनंतर या जागेवर कोण खेळणार हा प्रश्न उपस्थित होतो. सध्या टीम इंडियात श्रेयस अय्यर हा पर्याय दिसतोय. याचबरोबर सलामीवीर शुभमन गिलची बॅटिंग ऑर्डर देखील बदलली जाऊ शकते.

Virat Kohli Test Cricket Replacement Shubman Gill
Team India : टीम इंडियाचा सुर्य मावळणार; दिग्गज खेळाडूची ODI कारकीर्द संपुष्टात

10,000 क्लब पाहतोय वाट

विराट कोहली लवकरच कसोटीत लक्ष्मणला मागे टाकत भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत सचिन, राहुल आणि सुनिल गावसकर यांच्यानंतरचा चौथा फलंदाज होईल. विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावर पोहचण्यासाठी अजून 1521 धावांची गरज आहे. या धावा केल्यानंतर विराट कोहली कसोटी क्रिकेटमध्ये 10 हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज होईल. विराट ही कामगिरी या WTC सायकलमध्ये करू शकतो.

2025 नंतर काय असेल रणनिती?

विराट कोहली 2025 पर्यंत खेळेल. मात्र त्यानंतर भारतीय संघाकडे काय प्लॅन आहे? विराट कोहलीने 2013 मध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या सचिन तेंडुलकरची जागा घेतली होती. यापूर्वी त्याने पाचव्या क्रमांकावर भरपूर धावा केल्या होत्या. आता स्थिती वेगळी आहे. कोहलीकडे पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणारा युवा फलंदाज नाही.

Virat Kohli Test Cricket Replacement Shubman Gill
The Ashes ENG vs AUS: रोमांचक मोडवर पोहोचला सामना! शेवटचा दिवस इंग्लंडला 7 विकेट्स तर ऑस्ट्रेलियाला 174 धावांची गरज

श्रेयस अय्यरला लागलंय दुखापतींच ग्रहण

इएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार विराट कोहलीचा पर्याय म्हणून श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल यांच्याकडे पाहिले जात आहे. मात्र अय्यरला दुखापतींचे ग्रहण लागले आहे. त्याने नुकतेच आपल्या पाठीवर शस्त्रक्रिया करून घेतली आहे. तो डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करू शकतो.

गिलला चौथ्या क्रमांकावर खेळवण्याची तयारी

संघ व्यवस्थापनातील काही लोक शुभमन गिलला कसोटीत चौथ्या क्रमांकावर खेळवण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे शुभमन गिल वेस्ट इंडीज दौऱ्यावर मधल्या फळीत फलंदाजी करताना दिसू शकतो. याचबरोबर विराट कोहलीशी देखील याबाबत चर्चा केली जाईल. विराट कोहली मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील आपला वर्कलोड मर्यादित ठेवून आपली कसोटी कारकीर्द मोठी करू इच्छितो की नाही हे जाणून घेतले जाईल.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.