DY Chandrachud: जगभरातील क्रिकेट प्रेमी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) विश्वचषक सारख्या सर्वात प्रतिष्ठित ICC स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. यावेळी या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. ज्यामध्ये जगातील 10 संघ सहभागी झाले आहे. ICC पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 ची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड सामन्याने झाली.
या विश्वचषकात भारत दमदार कामगिरी करत आहे. भारताने सात सामने खेळले आणि सातही सामने जिंकले आहेत. दरम्यान एचटी लीडरशीप समिट 2023 शेवटच्या सत्रात बोलताना CJI चंद्रचूड यांनी विश्वचषकावर दिलखुलास गप्पा मारल्या. (Latest Marathi News)
भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकावा अशी माझी इच्छा आहे. मात्र मला एक सांगायचे आहे की केवळ पुरुषच नाही तर महिला संघानेही यश संपादन केले पाहिजे. मीही महिला संघाचा फॅन आहे. महिला संघही मला न्यायाधीश म्हणून प्रेरित करतात. त्यांचे मासिक आरोग्य आणि समता राखण्याची पद्धत मला प्रभावित करते, असे CJI चंद्रचूड म्हणाले.
आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा शिकण्यासाठी असतो. न्यायपालिकेचा प्रमुख म्हणून माझे काम केवळ निर्णय घेणे नाही तर न्याय व्यवस्था सुधारणे हे आहे, असे देखील CJI चंद्रचूड यांनी स्पष्ट केले.
CJI चंद्रचूड म्हणाले, सरन्यायाधीश माणसेच असतात. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आठवड्यातून 200 खटल्यांची सुनावणी करतात. अशा परिस्थितीत समतोल राखण्याचे मोठे आव्हान त्याच्यासमोर आहे. एका बाजूला कामाचे दडपण असते तर दुसरीकडे मानसिक ताण असतो. न्यायाधीशांसाठी ही मोठी समस्या आहे.
कोणत्या प्रकारचे बदल आवश्यक आहेत याचा विचार करण्यासाठी न्यायाधीशाने थोडा वेळ घेतला पाहिजे. याशिवाय दिवसातून किमान 45 मिनिटे वाचन केले पाहिजे. हा माझ्या जीवनाचा मंत्र आहे. मी पुस्तके वाचतो आणि संगीत ऐकतो. यामुळे खूप शांतता आणि शक्ती मिळते, असे CJI चंद्रचूड म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.