Team India : जागतिक क्रिकेटवर भारताचेच राज्य! कसोटी, एकदिवसीय अन् टी-२०च्या क्रमवारीतही पटकावलं पहिलं स्थान

Team India Latest News : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ताजा गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानावर असून न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आहे.
Team India
Team India
Updated on

दुबई : ऑस्ट्रेलियाने रविवारी न्यूझीलंडवर मात करीत कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या विजयासह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर असलेल्या न्यूझीलंडची दुसऱ्या स्थानावर घसरण झाली. तसेच दुसऱ्या स्थानावर असलेला भारतीय संघ पहिल्या स्थानावर पोहोचला. भारतीय क्रिकेट संघ आयसीसीच्या एकदिवसीय व टी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर कायम आहे. कसोटी क्रमवारीतही ऑस्ट्रेलिया व भारत यांचे समान रेटिंग (११७) आहेत.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ताजा गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानावर असून न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे; मात्र पहिल्या तीन देशांच्या विजयाच्या टक्केवारीत जास्त फरक नाही. त्यामुळे आगामी काळात देशांच्या क्रमवारीत चढ-उतार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

...तर ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर पोहोचणार

गतविजेता ऑस्ट्रेलियन संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत सध्या तिसऱ्या स्थानावर आहे; पण त्यांच्याकडे पहिल्या स्थानावर पोहोचण्याची संधी असणार आहे. न्यूझीलंडविरुद्धचा अखेरचा कसोटी सामना त्यांनी जिंकला, तर त्यांना दुसऱ्या स्थानावर पोहोचता येणार आहे. तसेच इंग्लंडने पाचव्या कसोटीत भारताला पराभूत केल्यास ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या स्थाानावरही झेप घेता येणार आहे.

Team India
Pragya Thakur: "PM मोदी म्हणाले होते मला माफ करणार नाही"; भोपाळमधून तिकीट नाकारल्यानंतर प्रज्ञा ठाकूर काय म्हणाल्या?

जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिका (अव्वल पाच)

१) भारत (६४.५८ सरासरी), २) न्यूझीलंड (६०.००), ३) ऑस्ट्रेलिया (५९.०९), ४) बांगलादेश (५०.००), ५) पाकिस्तान (३६.६६).

आयसीसी कसोटी क्रमवारी

१) ऑस्ट्रेलिया (पॉईंट ४३४५, रेटिंग ११७), २) भारत (पॉईंट ३७४६, रेटिंग ११७), ३) इंग्लंड (पॉईंट ४९४१, रेटिंग ११५), ४) न्यूझीलंड (पॉईंट २९३९, रेटिंग १०१), ५) दक्षिण आफ्रिका (पॉईंट २६७१, रेटिंग ९९ रेटिंग).

Team India
Ranji Trophy : रणजी ट्रॉफीमध्ये 'लॉर्ड' शार्दूलचे वादळ! षटकार मारत ठोकले पहिले शतक, अश्विनचे ट्वीट व्हायरल

आयसीसी एकदिवसीय क्रमवारी

१) भारत (रेटिंग १२१), २) ऑस्ट्रेलिया (रेटिंग ११८), ३) दक्षिण आफ्रिका (रेटिंग ११० रेटिंग), ४) पाकिस्तान (रेटिंग १०९), ५) न्यूझीलंड (रेटिंग १०२).

आयसीसी टी-२० क्रमवारी

१) भारत (रेटिंग २६६), २) इंग्लंड (रेटिंग २५६), ३) ऑस्ट्रेलिया (रेटिंग २५५), ४) न्यूझीलंड (रेटिंग २५४), ५) पाकिस्तान (रेटिंग २४९).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.