Team India : भारतीय अष्टपैलू खेळाडूने 30 व्या वर्षी अचानक घेतली निवृत्ती!

Team India
Team Indiasakal
Updated on

Roosh Kalaria Retirement : एकीकडे भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर कसोटी मालिका खेळत आहे, तर दुसरीकडे भारतातील डॅशिंग अष्टपैलू खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो केवळ 30 वर्षांचा आहे. या वयात अनेक क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करतात. हा खेळाडू 2012 च्या अंडर-19 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा भाग होता, ज्यात हनुमा विहारी आणि उन्मुक्त चंद यांचाही समावेश होता.

Team India
IND Vs BAN : 'तुमच्याबरोबर पंचांनाही बोलवा...' हरमनचा 'तो' टोमणा, बांगलादेश कर्णधाराचा संयम तुटला अन्...

गुजरातचा डावखुरा वेगवान गोलंदाज अष्टपैलू रोश कलारिया याने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कलारियाने 2012 च्या रणजी ट्रॉफीमध्ये मध्य प्रदेश विरुद्ध प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कलारिया 2016-17 हंगामात गुजरातच्या पहिल्या रणजी ट्रॉफी विजेतेपदाचा देखील एक भाग होता. त्याने आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत एकूण 173 विकेट घेतल्या.

Team India
Jadeja-Ashwin : अश्विन-जडेजा या जोडीने रचला इतिहास! कसोटी क्रिकेटमध्ये केला 'हा' मोठा विक्रम

भारताला बनवले वर्ल्ड चॅम्पियन

रोश कलारिया 2012 मध्ये भारताच्या अंडर-19 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. यासोबतच त्याने विविध देशांतर्गत स्पर्धांमध्येही गुजरातचे प्रतिनिधित्व केले. तो 2018-19 रणजी ट्रॉफीमध्ये गुजरातसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज देखील होता, त्याने 8 सामन्यांमध्ये 27 फलंदाजांना बाद केले. या कामगिरीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने त्याला आयपीएल 2021 मध्ये त्यांच्या संघात स्थान दिले. केरळविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातही त्याने हॅटट्रिक केली आहे.

Team India
Wi vs Ind Test: रोहित शर्माचा निर्णय नव्हता तर... कोणाच्या सल्ल्याने इशान नंबर-4 वर फलंदाजीला आला?

सोशल मीडियावर दिली माहिती

रोश कलारियाने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे. यासोबतच त्याने एक नोटही शेअर केली, ज्यामध्ये त्याने सर्वांचे आभार मानताना त्याच्या क्रिकेट प्रवासाबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने देखील त्याच्या इंस्टाग्रामवर कलारियाच्या संदर्भात पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की, 'उत्कृष्ट कारकिर्दीसाठी अभिनंदन. माझ्या मित्राला भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.