Team India T20 World Cup 2024 Schedule : यावर्षी भारतात होणाऱ्या एकदिवसीय वर्ल्ड कपसाठी सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत. या मेगा स्पर्धेत एकूण 10 संघ सहभागी होणार आहेत. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे.
याआधी टीम इंडिया अनेक मालिकांमध्ये सहभागी होणार आहे. सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. जिथे ते आता दोन कसोटी सामन्यांनंतर एकदिवसीय मालिका खेळत आहेत. यानंतर त्याला वेस्ट इंडिजविरुद्ध 5 टी-20 सामने खेळायचे आहेत.
टी-20 मालिकेत टीम इंडिया हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. पुढच्या वर्षी वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये टी-20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. यासाठी बीसीसीआय आधीच संघ तयार करण्यात गुंतला आहे.
वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळला जाणारा टी-20 वर्ल्ड कप खूप वेगळा असणार आहे. यावेळी विश्वचषकात 20 संघ सहभागी होणार आहेत. यासाठी 15 संघ पात्र झाले आहेत. अलीकडील ESPN क्रिकइन्फो अहवालानुसार, टी-20 वर्ल्ड कप 2024 जून 4 ते 30 जून दरम्यान आयोजित केला जाऊ शकतो.
याआधी टीम इंडिया आपली तयारी पूर्ण करू इच्छित आहे. या 4 वर्ल्ड कपपूर्वी भारतीय संघ एकूण 19 टी-20 सामने खेळणार आहे. ज्यामध्ये त्यांना देश-विदेशात अनेक टी-20 मालिका खेळायच्या आहेत. या विश्वचषकापूर्वी टीम इंडियाच्या टी-20 सामन्यांच्या वेळापत्रकावर एक नजर टाकूया.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (5 टी-20) - 03 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट
भारत विरुद्ध आयर्लंड (3 टी-20) - 18 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (5 टी-20) - 23 नोव्हेंबर ते 03 डिसेंबर (होम सीरिज)
भारत वि दक्षिण आफ्रिका (3 टी-20) - डिसेंबर किंवा जानेवारी
भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 टी-20) - 29 जानेवारी ते 7 मार्च (होम सीरिज)
आयपीएल 2023
भारतीय संघाला टी-20 वर्ल्ड कपपूर्वी तयारी करण्याची पूर्ण संधी आहे. त्याच वेळी आयपीएल 2024 देखील वर्ल्ड कपपूर्वी भारतात खेळवले जाईल, जिथे खेळाडूंना आपली तयारी करण्यासाठी आणखी संधी मिळेल. या टी-20 वर्ल्ड कप मध्ये BCCI हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला पाठवू शकते. हार्दिकने टी-20 मध्ये कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली आहे. त्याचवेळी त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएलमधील गुजरात टायटन्स संघाने दोन्ही हंगामातमध्ये अंतिम सामने खेळले आहेत. त्यापैकी एक फायनलही त्याने जिंकली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.