टीम इंडियाकडून गाबानंतर आता सेंच्युरियन 'सर'

टीम इंडियाचा अभेद्य गड सर करण्याचा धडाका सुरुच
Centurion First Test Victory
Centurion First Test Victoryesakal
Updated on

सेंच्युरियन : टीम इंडियाने विदेशी संघांना त्यांच्या बालेकिल्ल्यात मात देण्याचा धडाकाच लावला आहे. भारताने इतिहासात पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला त्यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गाबामध्ये (Gabba Test) पराभवाची धूळ चारली होती. आता दक्षिण आफ्रिकेचा सेंच्युरियन (Centurion) हा अभेद्य गड टीम इंडियाने (India national cricket team) नेस्तनाभूत केला. भारताने सेंच्युरिनवर दक्षिण आफ्रिकेचा तब्बल ११३ धावांनी पराभव करत मालिकेत १ - ० अशी आघाडी घेतली. (Centurion First Test Victory) विशेष म्हणजे या कसोटीत वेगवान गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. या सामन्यात ४० विकेट्स पडल्या. त्यातील ३८ विकेट्स या वेगवान गोलंदाजांनी घेतल्या आहे.

Centurion First Test Victory
पुजारा, रहाणेला काढून टाकण्याबाबत राठोड काय म्हणाले?

भारताने हा सामना जिंकून फक्त पहिल्यांदाच सेंच्युरियन (Centurion First Test Victory) सर करण्याचा पराक्रम केलेला नाही. तर टीम इंडियाने एका कॅलेंडर वर्षात आशिया बाहेर चार कसोटी जिंकण्याचा पराक्रम दुसऱ्यांदा करुन दाखवला आहे. यापूर्वी टीम इंडियाने २०१८ मध्ये जोहान्सबर्ग, नॉटिंगहॅम, अॅडलेड आणि मेलबर्न कसोटी जिंकली होती. तर २०१२ मध्ये भारताने ब्रिसबेन, लॉर्ड्स, ओव्हल आणि सेंच्युरियन कसोटी जिंकत ही एका कॅलेंडर वर्षात आशिया बाहेर चार कसोटी जिंकण्याची किमया दुसऱ्यांदा करुन दाखवली.

Centurion First Test Victory
'रोनाल्डोचा पुतळा बसवणे हा तर गोव्याचा अपमान'

भारताचा हा दक्षिण आफ्रिकेतील (South Africa vs India) चौथा कसोटी विजय आहे. यापूर्वी भारताने २००६ - ०७ ला जोहान्सबर्गमध्ये १२३ धावांनी विजय मिळवला होता. २०१० - ११ मध्ये डर्बन कसोटी ८७ धावांनी जिंकून आफ्रिकेतील दुसरा कसोटी सामना जिंकला. त्यानंतर २०१७ - १८ च्या दौऱ्यात भारताने पुन्हा जोहान्सबर्ग कसोटीत ६३ धावांनी विजय मिळवला होता. आता २०२१ मध्ये सेंच्युरियन कसोटीत आफ्रिकेचा ११३ धावांनी पराभव करत आपला आफ्रिकेतला चौथा विजय साजरा केला. भारताने दक्षिण आफ्रिकेत एकदाही कसोटी मालिका जिंकलेली नाही. यंदा भारताने तीन कसोटी मालिकेची १ - ० अशी विजयी सुरुवात करत मालिका विजयाच्या आशा पल्लवित केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.