Ambati Rayudu : धोनीचा पठ्ठ्या CM जगनमोहन रेड्डीच्या लागला गळाला; खासदार होणार की आमदार?

टीम इंडिया आणि आयपीएलमध्ये खेळल्यानंतर आता माजी क्रिकेटपटू राजकारणाच्या खेळपट्टीवर खेळण्यासाठी सज्ज ...
Ambati Rayudu will Start New Innings on Politics
Ambati Rayudu will Start New Innings on Politicssakal
Updated on

Ambati Rayudu : टीम इंडिया आणि आयपीएलमध्ये खेळल्यानंतर आता माजी क्रिकेटपटू राजकारणाच्या खेळपट्टीवर खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू अंबाती रायडू लवकरच जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षात जाऊन आंध्र प्रदेशमधून लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढवू शकतो.

रायुडू आयपीएल-2023 मध्ये चॅम्पियन बनलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचा एक भाग होता. फायनल सामन्यासह त्याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. रायुडू यांनी गेल्या आठवड्यात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याशी दोनदा भेट घेतल्यानंतर त्यांच्या राजकारणात सामील होण्याच्या अटकळांना बळ मिळाले आहे.

Ambati Rayudu will Start New Innings on Politics
Vinesh Phogat Wrestler Protest : सुनो द्रौपदी! शस्त्र उठा लो... आरोपपत्र दाखल होताच विनेशने रणशिंग फुंकले

टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, रायुडू कृष्णा किंवा गुंटूर जिल्ह्यातील कोणत्याही जागेवरून निवडणूक लढवू शकतात. तो मुळात गुंटूरचा आहे. सीएम जगनमोहन रेड्डी यांनी रायडूला निवडणुकीच्या उभे करण्याचा निर्णय घेतला आहे, परंतु त्यांना विधानसभा निवडणुकीत उमेदवार बनवायचे की लोकसभा निवडणुकीत निर्णय घ्यायचा आहे.

रिपोर्टनुसार, वायएसआर काँग्रेसशी संबंधित वरिष्ठ नेत्यांनी रायडूने विधानसभा निवडणूक लढवल्यास त्याला पोन्नूर किंवा गुंटूर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी द्यावी, असा सल्ला दिला आहे.

दुसरीकडे, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मछलीपट्टणम ही जागा त्यांच्यासाठी सर्वोत्तम पर्याय मानली जात आहे. जगनमोहन रेड्डी हे राजकारणात येणा-या तरुणांसाठी मोठी प्रेरणा आहेत आणि ते मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचे पालन करतील असे रायडू यांनी नुकतेच सांगितले होते.

Ambati Rayudu will Start New Innings on Politics
BAN vs AFG : भारत-पाकला जमलं नाही, ते बांग्लादेशने करून दाखवलं, कसोटी क्रिकेटमध्ये रचला इतिहास!

रायडूने 55 वनडे आणि 6 टी-20 मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 3 शतके आणि 10 अर्धशतकांसह 47.05 च्या सरासरीने 1694 धावा केल्या आहेत. वनडेत तीन विकेटही त्याच्या नावावर आहेत. रायुडूला टी-20 मध्ये फारसे यश मिळाले नाही आणि त्याला सहा सामन्यांत केवळ 42 धावा करता आल्या. रायुडूने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत 204 सामने खेळले ज्यात त्याने एक शतक आणि 22 अर्धशतकांसह 4332 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.