Paris Paralympic 2024: १ कोटी, सरकारी नोकरी अन् जमीन... पदकविजेत्या खेळाडूवर राज्य सरकारचा बक्षिसांचा वर्षाव

Telangana Government announces reward: गावकऱ्यांकडून मेंटल मंकी म्हणून हिणवल्या जाणाऱ्या 'कांस्य'कन्येचा तेलंगणा सरकारने कोटींचे बक्षीस देत सत्कार केला आहे.
Deepthi Jeevanji
Deepthi Jeevanjiesakal
Updated on

Deepthi Jeevanji: पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या दीप्ती जीवनजीला तेलंगणा सरकारने १ कोटी बक्षीस, द्वीतीय श्रेणीतील नोकरी आणि वारंगलमध्ये ५०० चौरस यार्ड जमीन देण्याचे जाहीर केली आहे. दीप्तीने भारतासाठी महिलांच्या ४०० मीटर टी-२० शर्यतीत कांस्यपदक जिंकले आहे. ही शर्यत दीप्तीने ५५.८२ सेकंदात पूर्ण केली. दिव्यांगत्वासह जन्मलेल्या आणि मेंटल मंकी नावाने गावात हिणवल्या जाणाऱ्या दीप्ती जीवनजीने पॅरिसमध्ये इतिहास रचला आहे.

तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंथ रेड्डी यांनी अधिकाऱ्यांना बक्षीसे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत आणि तिचे प्रशिक्षक, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते एन. रमेश यांनाही १० लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तसेच पॅरालिम्पिकमधील इतर खेळाडूंना प्रशिक्षण आणि अन्य प्रकारची मदत पुरवण्याचे अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

Deepthi Jeevanji
भारताच्या Navdeep Singh चं 'गोल्ड' होऊ शकतं का रद्द? इराणच्या खेळाडूची 'ती' चाल अन् IPC चा निर्णय

दीप्तीच्या पॅरालिम्पिकमध्ये खेळण्याच्या स्वप्नासाठी तिच्या रोजंदारीवर काम करणाऱ्या पालकांनी आठ वर्षांपूर्वी वारंगलमधील कल्लेडा येथील अर्धा एकर जमीन विकली होती. जी की दीप्तीने आपल्या कमाईमधून परत विकत घेतली आहे. परंतु दीप्तीच्या आर्थिक सहकार्यासाठी तिच्या पालकांनी केलेल्या या त्यागाबद्दल सरकारने तिला वारंगलमध्ये ५०० चौरस यार्ड जमीन जाहीर केली आहे.

दीप्ती मूळची आंध्र प्रदेश, वारंगल जिल्ह्यातील कलेदा गावातील आहे. ती जन्मतःच दिव्यांग होती व तिचे ओठ आणि नाक थोडेसे असामान्य होते. तिला पाहणारा प्रत्येक गावकरी आणि तिचे काही नातेवाईक दीप्तीला मंद माकड म्हणायचे आणि तिला अनाथाश्रमात पाठवायला सांगायचे. परंतु आज तिला परदेशात वर्ल्ड चॅम्पियन बनताना पाहून ती खरोखरच एक कौशल्यवान मुलगी आहे हे सिद्ध झाले आहे.

Deepthi Jeevanji
Big Breaking: Navdeep Singh च्या रौप्यपदकाचे 'सुवर्ण'मध्ये रुपांतर झालं; भारतीय खेळाडूचं नशीब चमकलं, पण नेमकं असं काय घडलं?

दीप्तीने जगाला दाखवून दिले आहे की इच्छाशक्ती असेल तर काहीही साध्य करता येते.दीप्तचा हा प्रवास आव्हानांनी भरलेला व प्रेरणादायी आहे. आव्हानांना न जुमानता आणि कधीही हार मानता पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये दीप्तीने देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.