Paris Olympic 2024 : ऑलिंपिकमधील पराभवानंतर टेनिसपटू अँडी मरेच्या कारकिर्दीची समाप्ती

ब्रिटनचा दिग्गज टेनिसपटू अँडी मरे याला पॅरिस ऑलिंपिकमध्ये पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सरळ सेट्समध्ये पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्याने व्यावसायिक कारकिर्दीची समाप्ती करत असल्याचे स्पष्ट केले.
Tennis player Andy Murray announce his retirement after defeat in Olympics 2024
Tennis player Andy Murray announce his retirement after defeat in Olympics 2024SAKAL
Updated on

पॅरिस : ब्रिटनचा दिग्गज टेनिसपटू अँडी मरे याला पॅरिस ऑलिंपिकमध्ये पुरुष दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सरळ सेट्समध्ये पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्याने व्यावसायिक कारकिर्दीची समाप्ती करत असल्याचे स्पष्ट केले.

मरे ऑलिंपिक एकेरीतील दोन वेळचा विजेता आहे. यावेळच्या ऑलिंपिकमधील पुरुष दुहेरीत त्याला सहकारी डॅन इव्हान्स याच्यासह टेलर फ्रिट्झ व टॉमी पॉल या अमेरिकेच्या तृतीय मानांकित जोडीकडून ६-२, ६-४ असा पराभव पत्करावा लागला.

पॅरिस ऑलिंपिकपूर्वीच ३७ वर्षीय मरे याने खेळातील आपल्या निवृत्तीपूर्वी ही अखेरची स्पर्धा असल्याचे जाहीर केले होते. या खेळातील माझ्या कारकिर्दीची, माझ्या कर्तृत्वाचा आणि कामगिरीची मला अभिमान आहे, असे तो म्हणाला.

Tennis player Andy Murray announce his retirement after defeat in Olympics 2024
Paris Olympic 2024 : जोकोव्हीच-अल्काराझ 'गोल्डन' मॅच! सर्बियन खेळाडू विम्बल्डनचा वचपा काढणार?

मरे याने २०१२ मध्ये अमेरिकन ओपन, तर २०१३ व २०१६ मध्ये विंबल्डनमध्ये विजेतेपद पटकावले होते. २००५ मध्ये तो व्यावसायिक टेनिसपटू बनला. एकेरीतील कारकिर्दीत तो १००१ सामने खेळला. शिवाय ४६ एटीपी करंडक पटकावले; तर २०१५ साली डेव्हिस कप जिंकलेल्या ब्रिटनचे नेतृत्व केले.

सामन्यानंतर काही वेळाने मरे याने आपण निवृत्तीसाठी सज्ज असल्याचे सांगितले. मी अखेरच्या वेळेस स्पर्धात्मक सामना खेळ असल्यामुळे भावनिक होणे साहजिकच आहे, असे तो म्हणाला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.