Rafael Nadal Retirement : राफेल नदाल करणार निवृत्तीची घोषणा? बोलावली पत्रकार परिषद

Rafael Nadal Retirement
Rafael Nadal Retirementesakal
Updated on

Rafael Nadal Retirement : टेनिस जगतातील क्ले कॉर्टचा बादशाह, विक्रमी 22 ग्रँडस्लॅम जिंकणारा राफेल नदाल गेल्या काही काळापासून टेनिस कोर्टपासून दूर आहे. आता तो त्याच्या आवडत्या फ्रेंच ओपनमध्ये दिसेल अशी आशा त्याच्या चाहत्यांना होती. मात्र राफेल नदालने अचानक आज पत्रकार परिषद घेणार असल्याचे सांगत सर्व चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. या पत्रकार परिषदेत दुखापतींनी ग्रासलेला राफेल नदाल फ्रेंच ओपन 2023 मधून माघार घेईल अशी चर्चा सुरू आहे. याचबरोबर काही चाहत्यांना तो आपल्या निवृत्तीची अधिकृत घोषणा देखील करण्याची भिती वाटत आहे.

Rafael Nadal Retirement
SRH vs RCB : जिंकायला लागतंय! प्ले ऑफचे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी RCB उतरवणार कडक संघ

जानेवारी महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत राफेल नदालला हिप इंज्युरी झाली होती. तेव्हापासून तो टेनिस कोर्टपासून लांबच राहतोय. दरम्यान स्पेनमधील एका विश्वासू माध्या समुहाने माहिती दिली की राफेल फ्रेंच ओपनमधून माघारीची घोषणा आजच्या पत्रकार परिषदेत करेल. तर स्पेनमधील दुसऱ्या माध्यम संस्था या फ्रेंच ओपनमधून माघारीबरोबरच राफेल नदाल आपल्या निवृत्तीची तारीख देखील जाहीर करण्याची शक्यता आहे.

Rafael Nadal Retirement
IPL 2023 Play Off : काय हंगाम आहे! संघ 15 गुणांसह होणार पात्र मात्र 16 गुण ठरू शकतात धोक्याचे...

मालोरका येथील राफेल नदाल अकॅडमीमध्ये नदाल पत्रकार परिषद घेणार आहे. 36 वर्षाच्या राफेल नदाल मे महिन्याच्या सुरूवातीला झालेली इटालियन ओपनमध्ये खेळला नव्हाता. त्याने बार्सिलोना आणि माद्रिद ओपनप्रमाणे इटालियन ओपनमधूनही माघारी घेतली होती. आता तो फ्रेंच ओपनमधूनही माघार घेण्याची शक्यता आहे. राफेल नदालने विक्रमी 14 वेळा फ्रेंच ओपन जिंकली आहे. ही स्पर्धा 28 मे पासून पॅरिस येथे होत आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.