PSL Karachi Terrorist Attack : खेळाडूंच्या हॉटेलबाहेर दहशतवादी हल्ला; इंग्लंड, न्यूझीलंडचे खेळाडूंची पाचावर धारण

PSL Karachi Terrorist Attack
PSL Karachi Terrorist AttackESAKAL
Updated on

PSL Karachi Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. नुकतेच कराचीमधील पोलीस मुख्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यावेळी पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. पोलिसांनी या चकमकीत सर्व दहशतवाद्यांना ठार केले.

मात्र हा दहशतवादी हल्ला पाकिस्तान सुपर लीगमधील संघ थांबलेल्या हॉटेलच्या जवळच झाला. यामुळे पाकिस्तान सुपर लीगच्या भविष्याबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ज्या ठिकाणी दहशतवादी हल्ला झाला त्या ठिकाणच्या हॉटेलमध्ये पीएसएलमधील जवळपास सर्व संघ थांहले होते. रात्रभर चालेल्या या चकमकीमुळे हॉटेलबाहेर थांबलेल्या खेळाडूंमध्ये चांगलीच घबराट पसरली.

PSL Karachi Terrorist Attack
PSL Naseem Shah : नसीम शाहनेच पाकिस्तान प्रीमियर लीगचा दरिद्रीपणा आणला समोर; Photo व्हायरल

पाकिस्तान सुपर लीगमध्ये सहभागी झालेल्या इंग्लंडच्या खेळाडूंनी कराची पोलीस मुख्यालयातील दहशतवादी हल्ल्यानंतर ट्विट देखील केले होते. ज्यावेळी हा दहशतवादी हल्ला झाला त्यावेली क्वेट्टा ग्लॅडिएटर आणि लाहोर कलंदर कराची स्टेडियममध्ये सराव करत होते. या हल्ल्यामुळे दोन्ही संघांतील खेळाडूंना बराच काळ स्टेडियममध्येच थांबावे लागले. यात इंग्लंड, न्यूझीलंडचे खेळाडू देखील होते.

या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पाकिस्तान प्रीमियर लीगच्या फ्रेंचायजींमध्ये एक तातडीची बैठक झाली. या दोघांनीही पाकिस्तान प्रीमियर लीगचे सामने सुरू ठेवण्याचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला.

PSL Karachi Terrorist Attack
IND vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलियाची झुंजार फलंदाजी; दिवसअखेर घेतली 62 धावांची आघाडी

मुख्यमंत्रांनी दिले कडक सुरक्षेचे आश्वासन

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सिंध प्रांताचे मुख्यमंत्री मुराद अली शाह यांनी कराची पोलीस मुख्यालयावर झालेल्या हल्ल्याचा परिणाम हा पीएसएल 8 च्या सामन्यांवर होणार नाही. सर्व सामने ठरल्या प्रमाणे होतील. पीएसएलला राष्ट्रपतींना देण्यात येते तशी सुरक्षा पुरवण्यात आली आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : ट्रेडिंग कुठल्याही प्रकारचे असो 'स्टाॅप लाॅस' हवाच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.