Thailand Open Lakshya Sen: विजेतेपदाचे ‘लक्ष्य’ हुकले! थायलंड ओपन बॅटमिंटन स्पर्धेत सेन उपांत्य फेरीत पराभूत

Thailand Open Lakshya Sen
Thailand Open Lakshya Sensakal
Updated on

Thailand Open Lakshya Sen : तीन गेमच्या कडव्या लढतीत लक्ष्य सेनला पराभव स्वीकारावा लागला आणि त्यासह थायलंड ओपन स्पर्धेतील भारतीय खेळाडूंचे आव्हानही संपुष्टात आले. यजमान थायलंडच्या आणि द्वितीय मानांकित कुन्लावूत वितिदसर्न याने एक तास १५ मिनिटे रंगलेला हा सामना १३-२१, २१-१७, २१-१३ असा जिंकला.

Thailand Open Lakshya Sen
Ruturaj Gaikwad Wedding Photos: अखेर विकेट पडली! ऋतुराज गायकवाड अडकला लग्नबंधनात; फोटो व्हायरल

यंदाच्या मोसमातील स्पर्धांत लक्ष्य सेन पहिल्यांदा उपांत्य फेरीत दाखल झाला होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेत त्याला उपांत्यपूर्व फेरीत पराभूत व्हावे लागले होते. यंदाच्या स्पर्धांत त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. परिणामी त्याची जागतिक क्रमवारीत २३ व्या स्थानापर्यंत घसरण झाली होती. काही वर्षांपूर्वी तो सहाव्या स्थानापर्यंत पोहचला होता.

पहिल्या गेमध्ये दोन्ही स्पर्धकांत सुरुवातीला चांगली स्पर्धा झाली, मात्र लक्ष्य सेनने ११-६ अशी आघाडी घेत प्रगती करण्यास सुरुवात केली; परंतु थायलंडच्या या स्पर्धकाने सलग चार गुण मिळवत पिछाडी ११-१० अशी कमी केली. या लढतीनंतर लक्ष्यने पाच गुणांची आघाडी घेत पहिला गेम जिंकला. त्यावेळी लक्ष्य सेन बाजी मारणार असे चित्र होते.

Thailand Open Lakshya Sen
Women's Junior Asia Cup Hockey : अन्नूची डबल हॅट्ट्रिक; भारताने उझबेकिस्तानविरूद्ध केले तब्बल 22 गोल

दुसऱ्या गेमध्ये मात्र कमालीची स्पर्धा झाली. दोन्ही स्पर्धक १०-१० पर्यंत पोहचले; परंतु बरोबरीची कोंडी फुटत नव्हती. कुन्लावूतने क्रॉस कोर्टचे शानदार फटके मारत १२-१० अशी आघाडी घेतली. या सामन्यात तो पहिल्यांदा आघाडीवर आला होता, त्यानंतर मात्र त्याने आपली पकड कमी होऊ दिली नाही. त्याने दीर्घ रॅलीजवर भर देत लक्ष्य सेनच्या क्षमतेला आव्हान दिले. मधूनच अचूक ड्रॉप शॉट मारून तो गुण वसूल करत होता. सलग चार गुण मिळवत त्याने दुसरा गेम जिंकला आणि सामना तिसऱ्या गेमवर नेला.

या निर्णायक गेममध्ये कुन्लावूतकडे सुरुवातीला ५-२ अशी आघाडी होती. त्यानंतर दोघांमध्ये कडवी चुरस होत होती; परंतु दीर्घ रॅलीजने लक्ष्य सेनच्या एकाग्रतेला शह दिला, या संधीचा फायदा घेत त्याने १८-१२ अशी आघाडी घेतली आणि त्यानंतर सामना जिंकण्यास जास्त वेळ घेतला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.