IPL 2023 Sponsors : आमच्यावर भरोसा नाही का? आयपीएलमधून अनेक स्पॉन्सरची माघार; जाणून घ्या नेमकं काय झालं

31 मार्च पासून आयपीएलच्या 16 व्या सिझनला सुरुवात होणार आहे.
IPL 2023 Sponsors
IPL 2023 SponsorsSakal
Updated on

IPL 2023 Sponsors : भारतात आयपीएलच्या क्रिकेट उत्सवाला आता काहीच दिवस शिल्लक आहेत. 31 मार्च पासून आयपीएलच्या 16 व्या सिझनला सुरुवात होणार आहे. पण मागील इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धांमध्ये प्रमुख प्रायोजक आणि जाहिरातदार राहिलेल्या ग्राहक इंटरनेट क्षेत्रातील अनेक कंपन्या यातून बाहेर पडल्या आहेत.

कारण जागतिक आर्थिक मंदीच्या परिस्थितीमुळे या कंपन्यांवर परिणाम झाल्याचे दिसून येते. यामध्ये Byju's, Unacademy, PhonePe, Amazon Prime, Pristyn Care, Zepto, Ather Energy, Niyo आणि Spotify या कंपन्यांचा समावेश आहे. यातील सर्व कंपन्या या तंत्रज्ञान क्षेत्रातील आहेत. (The Big Decline In Sponsor Companies Of IPL 2023)

व्हेंचर इंटेलिजन्स डेटा दर्शवितो की भारतीय स्टार्टअप्समधील निधी 2022 मध्ये 35.5 अब्ज डॉलर वरून 2022 मध्ये 23.9 बिलियन डॉलरवर आला आहे, अग्रगण्य स्टार्टअप कंपन्यांनी त्यांच्या खर्चामध्ये मोठी कपात केली आहे. IVCA आणि EY या उद्योग समूहाच्या अहवालानुसार एप्रिल 2022 मध्ये, स्टार्टअप्समधील फंडांची गुंतवणूक 27% ने घसरून 1.6 अब्ज डॉलर झाली आहे.

आयपीएल 2022 चे स्टार्टअप्स :

IPL 2022 मध्ये स्टार्टअप्स वाढ झाली होती, ज्यामध्ये 60 हून अधिक कंपन्यांनी यात सहभाग नोंदवला होता. स्टार स्पोर्ट्स या अधिकृत प्रसारकांनी 14 प्रायोजक मिळवले होते, त्यापैकी आठ स्टार्टअप्स होते. CRED, PhonePe, Spotify, Swiggy Instamart आणि Meesho हे सहयोगी प्रायोजक होते, तर Dream11, Tata Neu आणि Byju’s सह-प्रस्तुत प्रायोजक होते.

IPL 2023 Sponsors
Share Market : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी 'हे' नियम बदलणार; जाणून घ्या एका क्लिकवर

त्याचप्रमाणे, Disney+Hotstar वरील 18 पैकी 12 जाहिरातदार स्टार्टअप होते, ज्यात Dream11, CRED, Tata Neu, Zepto, Spinny, Pristyn Care, Swiggy, RuPay, Ather, Livspace, NiyoX आणि Spotify यांचा समावेश होता.

या व्यतिरिक्त, 40 हून अधिक स्टार्टअप विविध संघांना निधी पुरवत होते. आयपीएल 2022 हा खऱ्या अर्थाने स्टार्टअप्ससाठी उत्सव बनला होता.

काही इतर टेक स्टार्टअप्स जे मागील वर्षांमध्ये विशिष्ट IPL संघांचे प्रायोजक होते, जसे की Meesho आणि Cars24 या कंपन्यांनी हंगामातून माघार घेतली आहे. मात्र अथर एनर्जी कंपनी गुजरात टायटन्ससोबतची भागीदारी सुरू ठेवणार आहे.

अधिकृत IPL भागीदार म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी (BCCI) करार केलेल्या नवीन कंपन्यांमध्ये Dream11, Cred, Upstox आणि Swiggy Instamart यांचा समावेश आहे.

IPL 2023 Sponsors
नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

कोविड-19 च्या अलिकडच्या वर्षांत आयपीएलवरही परिणाम झाला आहे, ज्यामुळे स्पर्धा उशिरा झाली किंवा वेगवेगळ्या ठिकाणी सामने हलवले गेली. या वर्षी जागतिक आर्थिक मंदीचा परिणाम आयपीएलवरही दिसून येत आहे.

त्यामुळे आयपीएलचे प्रायोजकत्व आणि जाहिरातींसाठी कंपन्यांचा उत्साह आणखी कमी झाला आहे. तरीसुद्धा, या स्पर्धेने अजूनही मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आकर्षित करणे आणि बीसीसीआय आणि त्याच्या भागीदारांसाठी लक्षणीय कमाई करणे अपेक्षित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.