The French Open : मेदवेदेवला पराभवाचा धक्का ; सबलेंका, रायबकीनाचे दमदार विजय

फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅममध्ये सोमवारी पुरुष एकेरीतील पाचवा मानांकित डॅनिल मेदवेदेव याला पराभवाचा धक्का बसला.
The French Open
The French Opensakal
Updated on

पॅरिस : फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅममध्ये सोमवारी पुरुष एकेरीतील पाचवा मानांकित डॅनिल मेदवेदेव याला पराभवाचा धक्का बसला. ॲलेक्स दी मिनॉर याने त्याच्यावर चार सेटमध्ये विजय मिळवला. महिला एकेरी विभागात अरीना सबलेंका, एलीना रायबकीना यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत आगेकूच केली. सबलेंका हिने इम्मा नवारो हिला, तर रायबकीना हिने एलिना स्वितोलिना हिला पराभूत केले.

डॅनिल मेदवेदेव याने पहिला सेट ६-४ असा आपल्या नावावर केला. मात्र, ॲलेक्स दी मिनॉर याने पुढील तीनही सेटमध्ये मेदवेदेव याच्यावर वर्चस्व गाजवले. त्याने या तीन सेटमध्ये ६-२, ६-१, ६-३ अशी बाजी मारली व मेदवेदेवचा खेळ खल्लास केला.

दुसरी मानांकित अरीना सबलेंका हिने २२वी मानांकित इम्मा नवारो हिला ६-२, ६-३ असे सहज नमवले. सबलेंका हिने एक तास व नऊ मिनिटांत प्रतिस्पर्धीचे आव्हान संपुष्टात आणले. चौथी मानांकित एलीना रायबकीना हिने १५वी मानांकित एलीना स्वितोलिना हिच्यावर ६-४, ६-३ अशी सरळ दोन सेटमध्ये मात केली. तिनेही एक तास व नऊ मिनिटांत विजय साकारला.

स्विअतेक, गॉफची घोडदौड

महिला एकेरीत रविवारी मध्यरात्री इगा स्विअतेक व कोको गॉफ या दोन मानांकित खेळाडूंनी पुढे पाऊल टाकले. प्रथम मानांकित स्विअतेक हिने ॲनास्तासिया पोतापोवा हिचा ६-०, ६-० असा धुव्वा उडवला. स्विअतेक ही अवघ्या ४० मिनिटांमध्ये विजयी झाली. तिसरी मानांकित गॉफ हिनेही शानदार विजयाला गवसणी घातली. तिने एलिसाबेता कोशिअरेटो हिचे आव्हान ६-१, ६-२ असे संपुष्टात आणले.

यानिक सिनरची यशस्वी झुंज

पुरुष विभागातील एकेरीच्या लढतीत दुसरा मानांकित यानिक सिनर याने संघर्षपूर्ण विजय साकारला. सिनर याने कोरेंटीन मॉटेट याच्यावर चार सेटमध्ये मात केली. सिनर याने पहिला सेट २-६ असा गमावला. त्यानंतर मात्र त्याने झोकात पुनरागमन केले. सिनर याने पुढील तीन सेट ६-३, ६-२, ६-१ असे जिंकत सामना जिंकला आणि पुढे वाटचाल केली. सिनरसह पुरुषांच्या एकेरीत कार्लोस अल्काराझ, ग्रिगोर दिमित्रोव, स्टेफानोस सितसिपास यांनीही घोडदौड केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.