1983 चा ऐतिहासिक World Cup विजय रतन टाटांशिवाय शक्य झाला नसता; 'या' खेळाडूंना चमकवण्यात त्यांचं मोठं योगदान

Ratan Tata Passed Away : 1983 च्या अविस्मरणीय विजयात रतन टाटा यांचं योगदान उल्लेखनीय होतं.
1983 World Cup Ratan Tata
1983 World Cup Ratan Tataesakal
Updated on
Summary

रतन टाटा (Ratan Tata) यांनी आपल्या नेतृत्व आणि परोपकाराच्या माध्यमातून भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान दिले. त्यांची अशी अनेक योगदानं आहेत, ज्याकडं जगाचं लक्ष गेलं नाही.

Ratan Tata Passed Away : भारतातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

रतन टाटा (Ratan Tata) यांनी आपल्या नेतृत्व आणि परोपकाराच्या माध्यमातून भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान दिले. त्यांची अशी अनेक योगदानं आहेत, ज्याकडं जगाचं लक्ष गेलं नाही. यापैकी एक म्हणजे 1983 मध्ये टीम इंडियाचा (Team India) ऐतिहासिक विश्वचषक विजय!

1983 World Cup Ratan Tata
Ratan Tata : 'या' मराठी माणसामुळे देण्यात आले 'Tata Sumo' हे नाव! कहाणी जाणून तुम्हीही रतन टाटांना कराल सलाम

1983 च्या विश्वचषक विजयात टाटांचं उल्लेखनीय योगदान

1983 च्या अविस्मरणीय विजयात रतन टाटा यांचं योगदान उल्लेखनीय होतं. या विजयानं भारतात क्रिकेटला आघाडीवर आणलं. परंतु, टाटांच्या योगदानाशिवाय हे शक्य झालं नसतं. त्याच्यामुळेच तर भारताच्या विजयासाठी तीन महत्त्वाचे खेळाडू तयार होऊ शकले. आम्ही मोहिंदर अमरनाथ, रवी शास्त्री आणि संदीप पाटील यांच्याबद्दल बोलत आहोत.

1983 World Cup Ratan Tata
1983 World Cup Ratan Tataesakal

1983 च्या विश्वचषकापूर्वी (1983 World Cup) मोहिंदर अमरनाथ एअर इंडियाकडून तर, संदीप पाटील टाटा ऑइल मिल्सकडून खेळले होते. याशिवाय, रवी शास्त्री टाटा स्टीलकडून खेळायचे. अशा प्रकारे, तिन्ही खेळाडूंनी टाटा समर्थित देशांतर्गत संघांसह सुरुवात केली. त्यावेळी रतन टाटा यांनी टाटा समूहामध्ये व्यवस्थापकीय पद भूषवले होते. यावरून त्यांनी भारतातील क्रिकेटच्या विकासात किती मोठी भूमिका बजावली हे दिसून येते.

1983 World Cup Ratan Tata
'माझी संपूर्ण मालमत्ता बॉम्बने उडवून द्या, पण दहशतवाद्यांना..'; ताज हॉटेलवरील हल्ल्यानंतर काय म्हणाले होते रतन टाटा?

भारतीय क्रिकेटमध्ये रतन टाटांचं मोठं योगदान

भारतीय क्रिकेटमधील रतन टाटा यांचं योगदान केवळ एवढ्यापुरते मर्यादित नव्हते. या तीन क्रिकेटपटूंशिवाय फारुख इंजीनियर (टाटा मोटर्स), जवागल श्रीनाथ (इंडियन एअरलाइन्स), संजय मांजरेकर (एअर इंडिया), किरण मोरे (टीएससी), रुसी सुरती (आयएचसीएल), संदीप पाटील, व्हीव्हीएस लक्ष्मण (इंडियन एअरलाइन्स), युवराज सिंग (इंडियन एअरलाइन्स), हरभजन सिंग (इंडियन एअरलाइन्स), सुरेश रैना (एअर इंडिया), रॉबिन उथप्पा (एअर इंडिया), मोहम्मद कैफ (इंडियन एअरलाइन्स), निखिल चोप्रा (इंडियन एअरलाइन्स), इरफान पठाण (एअर इंडिया), आर. पी. सिंग इत्यादी खेळाडूंनी आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात 'टाटा समूहा'च्या माध्यमातून केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.