Paralympic 2024: भारतीय संघाचे डझनभर पदकांचे लक्ष्य; पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू पॅरिसला रवाना!

Latest Marathi Sports News: ॲथलेटिक्सच्या स्पर्धा ३० ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत होणार आहेत.
Paralympic 2024: भारतीय संघाचे डझनभर पदकांचे लक्ष्य; पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू पॅरिसला रवाना!
Updated on

Latest Marathi News: पाच सुवर्णांसह एकूण डझनभर पदकांचे ध्येय बाळगणाऱ्या भारतीय संघाचा पहिला जथ्था आज पॅरालिंपिक स्पर्धेसाठी पॅरिसला रवाना झाला. यात स्टार भालाफेकपटू सुमित अंतिल याच्यासह ॲथलेटिक्स खेळाडूंचा समावेश आहे. पॅरिसमधील हवामानाशी मिळतेजुळते होण्यासाठी भारतीय संघ लवकर तेथे पोहोचणार आहे.

ऑलिंपिक संपल्यानंतर आता पॅरिसमधील पॅरालिंपिक स्पर्धा २८ ऑगस्टपासून सुरू होत आहे. भारताचा हा पहिला १६ खेळाडूंचा संघ हॉटेलमध्ये राहणार आहे आणि उद्घाटन सोहळ्याच्या तीन दिवस अगोदर क्रीडानगरीत दाखल होणार आहे. ॲथलेटिक्सच्या स्पर्धा ३० ऑगस्ट ते ८ सप्टेंबर या कालावधीत होणार आहेत.

Paralympic 2024: भारतीय संघाचे डझनभर पदकांचे लक्ष्य; पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू पॅरिसला रवाना!
Paris Olympic 2024 : भारतामध्ये क्रीडा संस्कृती रुजायला हवी; गगन नारंग

गत वेळेस टोकियोत झालेल्या पॅरालिंपिक स्पर्धेत सुमित अंतिलने सुवर्णपदक जिंकले होते. यावेळीही सुवर्णपदक जिंकण्याचे त्याचे ध्येय आहे. मुख्य स्पर्धेच्या अगोदरचा पॅरिसमधील सराव त्याला फायदेशीर ठरू शकेल, असे सांगण्यात येत आहे. तो नेलसन मंडेला क्रीडा कॉम्प्लेक्समध्ये सराव केल्यानंतर क्रीडानगरीत दाखल होणार आहे, असे प्रशिक्षक सत्यनारायण यांनी सांगितले.

संघातील काही खेळाडू क्रीडानगरीच्या जवळ असलेल्या हॉटेलमध्ये राहणार असल्यामुळे त्यांना क्रीडानगरीतील सरावाच्या सुविधांचा वापर करता येईल, असेही ते म्हणाले. यंदाच्या या पॅरालिंपिक स्पर्धेत भारताला किती पदके मिळतील, असे विचारले असता सत्यनारायण म्हणाले, आम्ही कमित कमी पाच सुवर्णांसह १२ पदकांचे उद्दिष्ट ठेवले आहे. यंदा आमच्याकडून सर्वोत्तम कामगिरी होईल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Paralympic 2024: भारतीय संघाचे डझनभर पदकांचे लक्ष्य; पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू पॅरिसला रवाना!
Olympic Bronze Medalist स्वप्निल कुसाळेचे कोल्हापुरात जल्लोषात स्वागत; ढोल-ताशा, हलगी, झांजपथकाच्या गजरात मिरवणूक सुरू

कोबे (जपान) येथे मे महिन्यात झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताला सहा सुवर्ण, पाच रौप्य आणि सहा ब्राँझपदके मिळाली होती आणि सहावा क्रमांक मिळाला होता हा अनुभव या पॅरालिंपिक स्पर्धेस उपयोगी ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

सुमित अंतिल (पुरुष भालाफेक), दीप्ती जीवांजी (महिला ४०० मी.), सचिन खिलाली (पुरष थाळीफेक), एकता भ्यान (महिला क्लब थ्रो). सिमरन शर्मा (महिला २०० मी.) आणि मरियप्पन थांगवेलू (पुरुष उंच उडी) यांनी जपानमधील स्पर्धेत सुवर्णपदके मिळवली होती.

Paralympic 2024: भारतीय संघाचे डझनभर पदकांचे लक्ष्य; पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडू पॅरिसला रवाना!
Olympic Players from Uttarakhand: पॅरिस ऑलिम्पिकमधून घरी परल्यानंतर खेळाडूंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

२०२१ मधील टोकियोतील पॅरालिंपिक स्पर्धेत भारताने एकूण १९ पदके जिंकण्याची शानदार कामगिरी केली होती. त्यात पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा ब्राँझपदकांचा समावेश होता. यावेळी पॅरिसमधील या स्पर्धेत भारताचा ८४ खेळाडूंचा संघ सहभागी होणार आहे. १२ खेळांत ते आपली गुणवत्ता सादर करतील. यात ३८ खेळाडू ॲथलेटिक्समधील आहेत. भारतीय पॅरालिंपिक समितीचे अध्यक्ष देवेंद्र झाझरिया यांनी तर किमान २५ पदकांचे लक्ष्य व्यक्त केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.