भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने इतिहास रचला; थॉमस कप फायनलमध्ये धडक

थॉमस कप बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत धडक; प्रणोयचा निर्णायक विजय
Thomas Cup Badminton Indian team
Thomas Cup Badminton Indian team
Updated on

बँकॉक : प्रतिष्ठेच्या थॉमस करंडक बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय संघ एकापेक्षा एक सनसनाटी विजय मिळवत आहे. ताकदवान डेन्मार्कचा ३-२ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत कधीही पदक न मिळवणारा भारतीय संघ आता सुवर्ण इतिहासाच्या उंबरठ्यावर आहे. पाच वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मलेशियाचा ३-२ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारताने आज डेन्मार्कवरही ३-२ अशी मात केली. पुन्हा एकदा निर्णायक सामन्यात प्रणोयने विजय मिळवला. उद्या सुवर्णपदकासाठी भारताचा सामना इंडोनेशियाविरुद्ध होणार आहे.(Thomas Cup Badminton Indian team)

सात्त्विकराज-चिराग शेट्टी यांचा दुहेरीत; तर एकेरीत किदांबी श्रीकांत आणि एच. एस. प्रणोय यांचे विजय निर्णायक ठरले. पहिल्या एकेरीच्या सामन्यात लक्ष्य सेनचा दिग्गज खेळाडू व्हिक्टर एक्सलसेनविरुद्ध १३-२१, १३-२१ असा पराभव झाला. दोघांमध्ये दीर्घ रॅलीज झाल्या. पहिल्या गेममध्ये तर एक रॅली ४५ फटक्यांची होती. पहिल्या दुहेरीत सात्त्विकराज आणि चिराग शेट्टी यांनी पुन्हा एकदा अपेक्षा पूर्ण केल्या. तीन गेमपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताच्या या जोडीने किम अस्त्रुप आणि मॅतिस ख्रिस्तिनसेन यांच्यावर २१-१८, २१-२३, २२-२० अशी मात केली.

किदांबी श्रीकांतलाही विजयासाठी शर्थ करावी लागली. १ तास २० मिनिटांच्या सामन्यात त्याने अँड्रिस अँस्टोसेनचे आव्हान २१-१८, १२-२१, २१-१५ असे संपुष्टात आणले. सुरुवातीला किदांबीचे काही फटके नेटमध्ये लागत होते. पुरुषांच्या दुसऱ्या दुहेरीत कृष्णप्रसाद आणि विष्णुवर्धन यांना अँड्रिस रास्मुसेन आणि फेड्रिक सोगार्ड यांच्याकडून १४-२१, १३-२१ असा पराभव झाला. अखेरच्या एकेरीच्या सामन्यात प्रणोयन रासमस गेमेकचा १३-२१, २१-९, २१-१२ असा पराभव करून इतिहास घडवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.