बृजभूषण सिंहांच्या समर्थनार्थ ३ वेळचा महाराष्ट्र केसरी पैलवान आखाड्यात; म्हणाला, हे तर…

three times Maharashtra kesari wrestler narsingh yadav supported wfp brij bhushan sharan singh
three times Maharashtra kesari wrestler narsingh yadav supported wfp brij bhushan sharan singh
Updated on

भारतीय कुस्ती परिषदेचे प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आले आहेत. अनेक भारतीय महिला कुस्तीपटू जंतरमंतरवर गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

दरम्यान कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या अडचणींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे, तर दुसरीकडे त्यांच्या समर्थनार्थ आता काही दिग्गज कुस्तीपटूंची नावेही पुढे येत आहेत. आधी दिव्या काकरन आणि आता तीन वेळा महाराष्ट्र केसरीची गदा आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नरसिंग यादवने ब्रिजभूषण शरण सिंग यांचे खुलेपणाने कौतुक केले आहे.

three times Maharashtra kesari wrestler narsingh yadav supported wfp brij bhushan sharan singh
Viral Video : जावईबापूला टस्सल, सासरेबुवांचा सिक्सर!; अन्नाच्या बॅटिंगवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

आज तकने दिलेल्या वृत्तानुसार, कुस्तीपटू नरसिंग यादव याने हे मोठे षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. एकेकाळी माझ्यासोबत जे षडयंत्र रचले गेले तेच कारस्थान ब्रिजभूषण यांच्याबाबतही केले जात असल्याचे त्याने म्हणाले. नरसिंग म्हणाला की, ब्रिजभूषण कुस्ती महासंघात आल्यानंतर नियमांमध्ये सुधारणा झाली असून प्रत्येक राज्यातील खेळाडूंना संधी मिळत आहे.

नरसिंग यादव म्हणाला की, हरियाणाच्या प्रत्येक प्रशिक्षण शिबिरात पक्षपात होतो. कुठे होत नाही. ब्रिजभूषण शरणसिंग यांच्या विरोधात होते. प्रत्येकाला संधी दिली जाते, म्हणूनच हे सर्व घडत आहे. आरोप निराधार आहेत. प्रत्येकाला राष्ट्रीय पातळीवर खेळण्याचा अधिकार आहे. सर्व राज्यांतील खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये जाण्याचा अधिकार आहे.

ब्रिजभूषण यांच्या आगमनानंतर परिस्थिती बदलली आहे. हरियाणाशिवाय इतर राज्यांतील खेळाडूंनाही संधी मिळाली आहे. नॅशनल खेळल्याशिवाय देशाचा चांगला खेळाडू कोण हे कसे कळणार. असे लोक ब्रिजभूषण यांच्या विरोधात कट रचत आहेत, जसे माझ्यासोबत झाले, असे नरसिंग म्हणाला.

three times Maharashtra kesari wrestler narsingh yadav supported wfp brij bhushan sharan singh
अनेकांचे अधुरे स्वप्न होणार पूर्ण; Yamaha RX100 चा आवाज पुन्हा घुमणार

त्याने पुढे सांगितले की, कुस्तीमध्ये प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे. अशापने, कोणत्याही खेळात, ज्या राज्यात जास्त खेळाडू आहेत किंवा आधीच खेळत आहेत, ते मनमानी करतील. ते होऊ नये. आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत, कोणीही चौकशी करावी. हे राजकारण होत आहे.

नरसिंग यादव हा मूळचा यूपीमधील वाराणसीचा असून तो महाराष्ट्राकडून खेळतो. सध्या मुंबई पोलिसात कार्यरत आहे. अनुभवी कुस्तीपटू सुशील कुमार आणि त्याच्या प्रशिक्षकाने नरसिंगच्या ड्रिंकमध्ये ड्रग्स मिसळल्याचा आरोप आहे, त्यामुळे तो डोप टेस्टमध्ये नापास झाला. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()