Paralympic 2024 : पोरींनी कमाल केली! Thulasimathi Murugesan अन् मनीषा रामदास यांनी जिंकले ऐतिहासिक पदक

India at Paralympic 2024 : नितेश कुमारचे सुवर्ण आणि बहादूरगडच्या योगेश कथुनियाचे रौप्यपदक भारतीय चाहत्यांना सुखावणारे होते. त्यातच सोमवारी रात्री भारताच्या पोरींनी ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली.
Paralymic2024
Paralymic2024esakal
Updated on

Paris Paralympic 2024 Badminton: पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची पदकसंख्या २ सुवर्ण, ४ रौप्य व ५ कांस्य अशी एकूण ११ झाली आहे. सोमवारी नितेश कुमारने बॅडमिंटनमध्ये आणि योगेश कथुनियाने थाळी फेरीत अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक जिंकले. त्यानंतर रात्री थुलासिमाथी मुरूगेसन व मनीषा रामदास यांनी महिला एकेरीच्या SU5 गटात अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली. पॅरा बॅडमिंटनमधील महिला गटातील हे पहिलेच पॅरालिम्पिक स्पर्धेतील पदक ठरले.

थुलासिमाथीला सुवर्णपदकाच्या लढतीत चीनच्या यांग क्वियू झिआकडून २१-१७, २१-१० असा पराभव पत्करावाव लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. हे पॅरालिम्पिक स्पर्धेतील बॅडमिंटनमधील महिला खेळाडूने भारतासाठी जिंकलेले पहिले पदक ठरले. त्यानंतर कांस्यपदकाच्या लढतीत मनीषाने डेन्मार्कच्या कॅथरिन रोसेन्ग्रेनचा २१-१२, २१-८ असा पराभव केला.

Paralymic2024
Paralympic 2024: नितेशने पॅरिसमध्ये फडकवला तिरंगा! IIT पदवीधर आता सुवर्णपदक विजेता

मनीषा आणि थुलासिमाथी या दोघीही तामिळनाडूच्या. मनीषाला डॉक्टरांच्या चुकीमुळे उजवा हात गमवावा लागला होता. जन्माच्या दुखापतीमुळे मनीषा तिचा हात सरळ करू शकली नाही आणि तीन शस्त्रक्रिया करूनही नुकसान भरून काढता आले नाही. “मी इतर खेळाडूंना पाहेपर्यंत अपंगत्व कमी झाले नाही. मी माझा हात इतरांइतका उचलू शकत नसल्यामुळे, त्याचा माझ्या समतोलावर आणि मी निर्माण करू शकणाऱ्या शक्तीवरही परिणाम होतो,'' असे मनिषाने सांगितले होते.

तत्पूर्वी, नितेश कुमारचा सुवर्णपदकासाठी अंतिम सामना ग्रेट ब्रिटनच्या डॅनिएल बेथेलविरुद्ध झाला. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या सामन्यात नितेशने १ तास २० मिनिटाच्या लढतीनंतर २१-१४, १८-२१, २३-२१ अशा फरकाने विजय मिळवला. योगेश कथुनियाने पुरुषांच्या F56 थाळीफेक प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली. २९ वर्षीय नितेशने आयआयटी मंदीमधून पदवीचे शिक्षण घेतले आहे. नितेश याचा २००९ मध्ये अपघात झाला होता, ज्यामुळे त्याचा पायाला दुखापत झाली होती. त्याला या दुखापतीमुळे कायमस्वरुपी पायात अपंगत्व आले.

Paralymic2024
Rubina Francis in Paralympic: जन्मत:च पायात दिव्यांगत्व; पण परिस्थितीला हरवत मॅकेनिक वडिलांच्या लेकीची पॅरिसमध्ये पदकाची कमाई

पुरुषांच्या F56 थाळीफेकील ४८.३४ मीटरचा वर्ल्ड रेकॉर्ड योगेशच्या नावावर आहे. पण, आज त्याने पहिल्या प्रयत्नात ४२.२२ मीटर लांब थाळी फेकली आणि ही त्याची हंगामातील सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. भारताला यंदाच्या पॅरालिम्पिकमध्ये नेमबाज अवनी लेखराने भारताला सुवर्णपदक जिंकून दिले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.