IND vs WI 1st T20I Playing 11 : भारताने वेस्ट इंडीज विरूद्धची कसोटी मालिका आणि वनडे मालिका जिंकली असून आता टी 20 मालिकेत देखील हीच कामगिरी करण्याचा मनसुबा आहे. याचबरोबर 2024 मध्ये होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाचे कॉम्बिनेशन तपासण्याचा देखील या मालिकेत प्रयत्न केला जाईल.
आशिया कपपूर्वी भारतीय संघातील युझवेंद्र चहल आणि संजू सॅमसन यांना देखील आपली संघातील दावेदारी सादर करण्यासाठी ही मालिका एक चांगली संधी आहे. हार्दिक पांड्या या मालिकेत मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू तिलक वर्मा (Tilak Varma) आणि राजस्थान रॉयर्लचा यशस्वी जैसवालला पदार्पणाची संधी देणार का हा देखील प्रश्न आहे. (Team India T20I Playing 11)
भारतीय संघाचे सर्व लक्ष सध्या वनडे वर्ल्डकप 2023 कडे आहे. मात्र भारतीय संघ हळूहळू 2024 च्या टी 20 वर्ल्डकपच्या देखील तयारीला लागला आहे. हा वर्ल्डकप वेस्ट इंडीज आणि युएसएमध्ये होणार आहे. हार्दिक पांड्याने भारतीय टी 20 संघाची धुरा गेल्या वर्षीपासून आपल्या खांद्यावर घेतली आहे. तो गुरूवारच्या सामन्यात यशस्वी जैसवाल आणि तिलक वर्माला पदार्पणाची संधी देऊ शकतो.
दुसरीकडे आशिया कपसाठीच्या वनडे संघात स्थान मिळवण्यासाठी संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांच्यात चुरस आहे. त्यांच्या दृष्टीकोणातून देखील ही मालिका महत्वाची आहे. याचबरोबर आवेश खान आणि रवी बिश्नोई हे देखील भारतीय संघात (प्लेईंग 11) पुनरागमन करतील.
अर्शदीप सिंग हा भारतीय गोलंदाजीचं नेतृत्व करेल. उमरान मलिक आणि मुकेश कुमार देखील प्लेईंग 11 मध्ये असण्याची शक्यता आहे. वनडे मालिकेत चहलला संधी मिळाली नव्हती. मात्र टी 20 मध्ये त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
यशस्वी जैसवाल
शुभमन गिल / इशान किशन
सूर्यकुमार यादव
संजू सॅमनस
हार्दिक पांड्या
तिलक वर्मा
अक्षर पटेल
युझवेंद्र चहल / कुलदीप यादव
अर्शदीप सिंग
आवेश खान
रवी बिश्नोई
इशान किशन, शुभमन गिल, यशस्वी जैसवाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमारन मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.