नेटकऱ्यांनी घेतली टिम पेनची शाळा; मीम्स शेअर करत केलं ट्रोल

आमचा फोकस कमी झाला आणि आम्ही हरलो, असे टिम पेनने एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे.
 tim paine trolled
tim paine trolled twitter
Updated on

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाने 'गुमराह' केलं असा दावा करणाऱ्या ऑस्ट्रेलियन कर्णधार टिम पेनची (tim paine) भारतीयांनी चांगलीच शाळा घेतलीये. भारतीय संघातील खेळाडूंनी अनावश्यक गोष्टींचा गवगवा करुन आम्हाला बुचकळ्यात पाडले. ज्या गोष्टींची चर्चा करण्याची कोणतीच गरज नव्हती, अशा गोष्टी भारतीय खेळाडूंनी चर्चेत आणल्या. त्यामुळे आमचा फोकस कमी झाला आणि आम्ही हरलो, असे टिम पेनने एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे. भारताकडून घरच्या मैदानात झालेल्या पराभव कांगारुंच्या पचनी पडला नसल्याचे यातून समोर आले. भारतीय संघातील खेळाडूंनी अनावश्यक गोष्टींच्या माध्यमातून आम्हाला विचलित केले, असे म्हणणाऱ्या टिम पेनला भारतीयांनी ट्रोल करण्यास सुरुवात केलीये. सोशल मीडियावर वेगवेगळ्या मीम्सच्या माध्यमातून भारतीय नेटकरी त्याची शाळाच घेत आहेत. (tim paine trolled brutally after taking team india for gabba loss)

 tim paine trolled
कॅप्टन्सीच्या दुखण्यावरील 'पेन किलर' स्मिथला दिलासा देणारी

भारतीय संघातील खेळाडू प्रतिस्पर्धी संघाचे लक्ष्य विचलित करण्यात माहिर आहेत. त्यांच्या या गोष्टीला आम्ही फसलो. त्यामुळे आम्ही मालिका गमावली, असे टिम पेनने म्हटले आहे. टिम पेनचे हे वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आहेत. सोशल मीडियावर अनेकजण यासंदर्भात त्याला ट्रोल करत आहेत. मजेदार मीम्स शेअर करत चाहत्यांनी त्याच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

 tim paine trolled
ऑस्ट्रेलियन कर्णधाराचे टीम इंडियासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 सामन्यांची मालिका झाली होती. यातील पहिला सामना डे नाईट झाला. यात भारतीय संघाला मोठ्या फरकाने पराभूत व्हावे लागले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 8 विकेट्सनी पराभूत केले होते. मेलबर्नच्या मैदानात अजिंक्य रहाणेच्या शतकाच्या जोरावर भारतीय संघाने मालिकेत बरोबरी साधली होती. सिडनीच्या मैदानातील सामना अनिर्णित राहिला. त्यानंतर ब्रिस्बेनच्या मैदानातील निर्णायक सामन्यात भारतीय संघाने दिमाखदार विजय नोंदवत मालिका 2-1 अशी जिंकली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.