Time Out Controversy : बांगलादेश आणि श्रीलंकेच्या या सामन्यात जे घडले ते केवळ वर्ल्ड कपच नाही तर संपूर्ण क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच घडले. अँजेलो मॅथ्यूज क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच टाइम आऊट होणार खेळाडू ठरला आहे.
मात्र, या निर्णयाबाबत अनेक मतभेद पहिल्या मिळाले. पण, शेवटी निर्णय मॅथ्यूजच्या विरोधात गेल्याने तो चिडला. येथून भडकलेली ठिणगी संपूर्ण सामन्यात कायम राहिली. सामना संपल्यानंतरही आरोप-प्रत्यारोपचा खेळ सुरू असताना अँजेलो मॅथ्यूज आणि कुसल मेंडिस यांनी असे काही केले, ज्यानंतर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
कारण हा निर्णय बरोबर की चुकीचा ही नंतरची गोष्ट. एक खेळाडू म्हणून त्याने तो निर्णय मान्य करायला पाहिजे होता. पण ते क्रिकेटच्या इतर नियमांविरुद्ध गेले. यामुळेच त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.
चौथ्या पंचाचा निर्णय चुकीचा?
अँजेलो मॅथ्यूज आणि कुसल मेंडिस यांनी सामना संपल्यानंतर अंपायरचा निर्णय चुकीचा असल्याचे म्हटले आहे. या दोघांनी चौथ्या पंचाच्या निर्णयावर प्रश्नच उपस्थित केले.
टाइम आऊट देण्याच्या निर्णयावर मॅथ्यूज म्हणाले की, येथे चौथ्या पंचाने मोठी चूक केली. त्या घटनेचा जो व्हिडीओ समोर आला आहे, त्यात हेल्मेट अॅडजस्ट केल्यानंतरही माझ्याकडे 5 सेकंद बाकी असल्याचे स्पष्ट दिसत आहे. चौथ्या पंचाला ते बरोबर दिसले का? मला एवढेच सांगायचे आहे की सुरक्षा प्रथम येते आणि हेल्मेटशिवाय मी गोलंदाजाचा सामना करू शकलो नसतो.
मॅथ्यूजचे मत पुढे घेत श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने पंचांच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले. तो म्हणाला की, मी पंचांच्या निर्णयावर नाराज आहे. त्याने योग्य निर्णय घ्यायला हवा होता. अँजेलो मॅथ्यूजच्या हेल्मेटचे जे घडले ते कोणाच्याही बाबतीत होऊ शकते.
नक्की सामन्यात काय घडले...
श्रीलंकेच्या डावाच्या २४.२ षटकांत समरविक्रमा आऊट झाला. मग अँजेलो मॅथ्यूज वेळेत फलंदाजीस आला. पण डोक्यावरील हेल्मेट व्यवस्थित करण्यासाठी त्याने त्याची पट्टी ओढली. पट्टी ओढल्यामुळे हेल्मेटच्या आतला एक भाग तुटला. त्यामुळे त्याने लगेचच दुसऱ्या हेल्मेट माघवले. राखीव खेळाडू हेल्मेट घेऊन मैदानात येत होता. त्यावेळी बांगलादेशचा कर्णधार शकिब अल हसनने पंचांकडे अपील केले. पंचांनी ते अपील ग्राह्य धरून टाइम आऊटच्या नियमाने मॅथ्यूजला आऊट दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.