Tokyo Olympics Video: स्पर्धा जिंकल्यावर लाईव्ह टीव्हीसमोर बोलताना कायली भलतंच काहीतरी बोलली...
टोक्यो: सध्या टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धांचा माहोल आहे. विविध देशांतील खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धेत आपली सर्वोत्तम कामगिरी करायला उतरले आहेत. या स्पर्धेत नुकतीच १०० मीटर बॅकस्ट्रोक जलतरण स्पर्धा झाली. त्यात ऑस्ट्रेलियाच्या कायली मॅक्वूनने सुवर्णपदक पटकावलं. २० वर्षीय कायलीने अवघ्या ५७.४७ सेकंदात ही कामगिरी करून दाखवली. पण स्वत:च प्रस्थापित केलेल्या विश्वविक्रमापासून ती अवघ्या काही मिलिसेकंदांनी दूर राहिली. स्पर्धा जिंकल्यावर जेव्हा तिला तिच्या भावना व्यक्त करायला सांगितल्या तेव्हा तिच्या तोंडून असे काही शब्द बाहेर पडले की त्यामुळे तिने पटकन तोंडावरच हात ठेवला. याबद्दल प्रतिक्रिया देताना तिची आईदेखील म्हणाली की मी तिच्याकडे नंतर बघते. तिच्याशी नक्कीच या विषयावर बोलेन. (Tokyo 2020 Swimmer Kaylee McKeown Dropped F Bomb On Live TV After Olympic Gold Mother Said This see video)
नक्की काय घडला प्रकार?
कायलीने स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. तर कॅनडाच्या काईल मेस्सेने रौप्य आणि अमेरिकेच्या रेगन स्मिथने कांस्यपदकाची कमाई केली. कायलीने सुवर्णपदक जिंकल्यावर तिला विचारण्यात आले, "या विजयाबद्दल तुझ्या भावना काय? तुला तुझ्या आईला आणि बहिणीला काय सांगायचंय?". त्यावर अगदी सहजपणे तिच्या तोंडून काही असे शब्द बाहेर पडले जे सार्वजनिक ठिकाणी बोलणे योग्य नव्हते. क्षणार्धात तिच्या ती गोष्ट लक्षात आली आणि तिने शब्द सावरून घेतले. या घटनेबद्दल जेव्हा तिच्या आईला विचारण्यात आले, तेव्हा "मी टीव्हीतील माध्यमांची शपथ घेऊन सांगते, मी तिच्याशी नंतर या विषयावर नक्कीच बोलेन", असं तिची आई शेरॉन यांनी सांगितलं.
कायलीचे वडिल गेल्या वर्षी निधन पावले. त्यांना मेंदूचा कर्करोग झाला होता. या दूर्धर आजाराशी झुंजताना त्यांनी ५३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे गेल्या वर्षभरापासूनचा काळ हा कायली, तिची बहिण टेलर आणि त्यांची आई शेरॉन यांच्यासाठी कठीण होता. तशातच, या ऑलिम्पिक विजयामुळे त्यांना थोडेस स्मितहास्याचे क्षण मिळाले असतील या अनुषंगाने कायलीला तो प्रश्न विचारण्यात आला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.