तुझी कमी जाणवेल; सिंधूच्या वक्तव्यानं मनं जिंकली

तुझी कमी जाणवेल; सिंधूच्या वक्तव्यानं मनं जिंकली
Updated on

Tokyo Games : भारतीय बॅडमिंटनची सम्राज्ञी पी. व्ही. सिंधूने आपल्या प्रतिस्पर्धी खेळाडूबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा जेमतेम 50 दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यापूर्वीच सुवर्णपदकाची दावेदार असलेल्या स्पेनच्या कॅरोलिना मरिन हिने दुखापतीमुळे या स्पर्धेतून माघार घेतली आहे. कॅरोलिना मरिन हिने रिओ ऑलिंपिक स्पर्धेत सिंधूचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं होतं.

ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा जेमतेम 50 दिवसांवर येऊन ठेपली असतानाच प्रमुख बॅडमिंटन खेळाडू कॅरोलिना मरिन हिने गुडघ्याच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. कॅरोलिना मरिन हिने माघार घेतल्यामुळे आता सिंधूला सुवर्णपदकाचा दावेदार मानलं जात आहे. पण सिंधूनं कॅरोलिना मरिनला दुखापत लवकर बरी व्हावी म्हणून शुभेच्छा देत केलेल्या वक्तव्यामुळे सर्वांचीचं मन जिंकली आहे. ऑलिंपिकनं सिंधूचा व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओची आणि सिंधूची सध्या जोरदार चर्चा आहे.

तुझी कमी जाणवेल; सिंधूच्या वक्तव्यानं मनं जिंकली
WTC मध्ये 'हे' तीन भारतीय खेळाडू ठरणार 'गेमचेंजर'

काय म्हणाली सिंधू ?

कॅरोलिना मरिनच्या दुखापतीबद्दल ऐकून दु:ख झालं. ती लवकरात लवकर दुखापतीतून सावरेल, त्यासाठी मी प्रार्थना करेल. रिओ ऑलिंपिक स्पर्धेतील आपला अंतिम सामना मला अजूनही आठवतोय. तुझ्याविरोधात खेळायला आवडते. यावेळी कॅरोलिना मरिनसारख्या दर्जेदार खेळाडूची कमी बॅडमिंटनच्या कोर्टावर नक्कीच जाणवेल.

टोक्यो ऑलिंपिक स्पर्धेत कॅरोलिना मरिन सुवर्णपदकाची दावेदार मानलं जात होतं. मात्र, सरावादरम्यान कॅरोलिना मरिनला दुखापत झाली. त्यानंतर मंगळवारी कॅरोलिना मरिन हिने स्पर्धेतून नाव माघारी घेतलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.