ऑलिम्पिकमध्ये देशाचं नाव उंचावणाऱ्या प्रवीणच्या कुटुंबीयांना धमकी!

प्रवीणने 'पीटीआय'ला दिली धक्कादायक माहिती
Archer Pravin jadhav
Archer Pravin jadhavesakal
Updated on

टोकियो : ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) भारताचे नेतृत्व करत अनेक खेळाडू समाधानकारक कामगिरी करत आहेत, तर काहींच्या पदरी निराशा येत आहे. मात्र, असे असतानाही खराब कामगिरीमुळे अनेक खेळाडूंना नागरिकांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे, तर त्यांच्या कुटुंबीयांना धमक्याही दिल्या जात आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजी प्रकारात सहभाग घेतलेल्या साताऱ्याच्या प्रवीण जाधवच्या (Pravin Jadhav) कुटुंबीयांना धमकी दिली जात असून ही धमकी घराजवळ राहणाऱ्या शेजाऱ्यांकडून दिल्याचे प्रवीणने 'पीटीआय'शी बोलताना सांगितले.

Summary

ऑलिम्पिकमध्ये भारताचे नेतृत्व करत अनेक खेळाडू समाधानकारक कामगिरी करत आहेत, तर काहींच्या पदरी निराशा येत आहे.

सातारच्या प्रवीणने तिरंदाजीच्या सांघिक प्रकारात अतानू दास आणि तरुणदीप राय सोबत भाग घेतला होता, तर मिश्र दुहेरीमध्ये प्रवीणने दीपिकाकुमारी सोबत भाग नोंदवला होता. यात प्रवीणने अंतिम आठ पर्यंत झेप घेतली होती. आता ऑलिम्पिकमधून परतल्यावर प्रवीणने मिळवलेले यश पाहवत नसलेल्या शेजाऱ्यांनी त्याच्या कुटुंबीयांना धमकी देण्यास सुरुवात केलीय.

Archer Pravin jadhav
पोलिस दलातील 500 कर्मचाऱ्यांच्या बदल्‍या; ‘एसपीं’चे आदेश

जाधव यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीत सांगितले, की सकाळी एका कुटुंबातील पाच ते सहा लोक माझ्या घरी आले आणि त्यांनी माझी आई-वडील व काका-काकूंना धमकावण्यास सुरुवात केली. जाधव यांच्या कुटुंबातील चार सदस्य झोपडीत राहत होते. मात्र, प्रवीण सैन्यात भरती झाल्यानंतर त्यांनी पक्के घर बांधले आहे. याआधी देखील त्यांनी अशा प्रकारे त्रास दिला होता. माझ्या शेजाऱ्यांना घरापुढून एक वेगळा मार्ग हवाय. त्यावर आम्ही त्यांना होकारही दिला होता. मात्र, आता त्यांनी हद्द केलीय. त्यांनी माझ्या कुटुंबीयांना धमकी देण्यास सुरुवात केली असून यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. आम्ही घराची दुरुस्ती करणार असल्याने त्यांनी आम्हाला विरोध दर्शविला आहे, असेही त्याने पीटीआयला सांगितले. प्रवीण हा सातारा जिल्ह्यातील साराडे गावचा रहिवाशी आहे.

Archer Pravin jadhav
गढूळाचं पाणी कशाला ढवळीलं?; कोयनेच्या पाण्यावरुन गदारोळ!

ऑलिम्पिकमधून परतल्यावर भारतीय तिरंदाजी संघातील खेळाडू थेट हरियाणातील सोनिपथ येथे गेले असून तिथे ते पुढील महिन्यात होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी सराव करणार आहेत. प्रवीण पुढे म्हणाला, माझ्या कुटुंबीयांना खूप त्रास होत असून मी तिथे त्यांच्या सोबत नाही. याबाबत मी लष्करातील अधिकाऱ्यांशी बोललोय, असेही त्यांने सांगितले. याप्रकरणी कुटुंबीयांनी सातारा जिल्ह्याचे एसपी अजयकुमार बन्सल यांच्याशीही चर्चा केली असून त्यांनी पूर्ण मदती करण्याचे आश्वासन दिले आहे.

Archer Pravin jadhav
कऱ्हाडात तब्बल 905 जणांकडे परवानाधारक बंदुका

बन्सल म्हणाले, आम्हाला अद्याप कोणतीही लेखी तक्रार प्राप्त झालेली नाही. त्यामुळे कोणावरही कारवाई करणे शक्य नाही. मात्र, आर्मीतील एका कर्नलने केलेल्या फोनच्या आधारे, मी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी माझा स्थानिक प्रभारी तिथे पाठवत आहे. निश्चितपणे त्या कुटुंबाला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करु, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()