VIDEO बजरंगची कमाल; इराणी पैलवानाला चितपट करत दाखवलं आस्मान

सेमीफायनलमध्ये त्याची लढत अजरबैजानच्या 30 वर्षीय अलीव हाजी याच्या विरुद्ध रंगणार आहे.
Bajrang Punia
Bajrang Punia Twitter
Updated on

ऑलिम्पिक स्पर्धेत कुस्तीच्या आखाड्यातून बजरंग पुनियाकडून पदकाची आस आहे. इराणच्या पैलवानाला आस्मान दाखवत दिमाखात सेमीफायनल गाठलीये. 65 किलो वजनी गटात बजरंग पुनियाने कझाकिस्तानच्या एर्नाझर अकमतलीएव्ह याला पराभूत करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला होता. या लढतीत 3-3 अशी बरोबरीनंतर पुनियाला विजयी घोषीत करण्यात आले होते. सामन्यावरील पकड आणि पहिल्यांदा मिळवलेली आघाडीच्या जोरावर बजरंगला मिळालेला विजय चाहत्यांसाठी फारसा आनंद देणारा निश्चितच नव्हता. पुढच्या सामन्यात बजरंगने ही उणीव भरुन काढली.

क्वार्टर फायनलमध्ये त्याची लढत इराणच्या मोर्टेझाला (Morteza Ghiasi) याच्याविरुद्ध रंगली होती. या लढतीवेळी दोन्ही पैलवान बचावात्मक पवित्रा घेताना दिसले. गुण घेण्याचा कोणताही प्रयत्न न केल्यामुळे बजरंगला एक गुणाचा तोटा सहन करावा लागला. पंचांनी पहिला पॉइंट इराणच्या मल्लाला दिला. इराणच्या मल्लाकडे 1-0 अशी आघाडी असताना बजरंगने दोन पॉइंट मिळवत सामन्यात आघाडी घेतली. पाच मिनिटांच्या आतच प्रतिस्पर्ध्याला चितपट करत बजरंग पुनियाने दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय.

Bajrang Punia
Olympics ...अन् महिला संघाची मजबूत भिंत आसवांनी भिजली!

सेमीफायनलमध्ये त्याची लढत अजरबैजानच्या 30 वर्षीय अलीव हाजी याच्या विरुद्ध रंगणार आहे. रवि कुमार दाहियानंतर बजरंग पुनिया फायनलमध्ये प्रवेश करुन गोल्ड मेडलची आस निर्माण करेल, अशी तमाम कुस्ती शौकीनांना अपेक्षा आहे. तत्पूर्वी आज कुस्तीमध्ये महिला गटात सीमा बिस्लाचे आव्हान संपुष्टात आले. तिला प्री क्वार्टर फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यापूर्वी रवि दाहियाने रौप्य पदकाची कमाई करत कुस्तीतील पदकाचा खाते उघडले आहे. या पदकासह भारताच्या खात्यात 5 पदके जमा झाली आहेत. यात बजरंग पुनिया आणखी एका पदाची भर करेल, असे वाटते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()