भारतीय महिला बॉक्सर पूजा रानीने ऑलिम्पिक स्पर्धेत आपल्या गटात धमाकेदार सुरुवात केलीये. 75 किलो मिडलवेट वजनी गटात तिने क्वार्टर फायनलमध्ये प्रेवश केलाय. राउंड-16 मध्ये तिने अल्जेरियाच्या इचरक चाईब 5-0 अशा फरकाने एकतर्फी विजय नोंदवला. मेडलच्या शर्यतीत पोहचण्यासाठी आता ती केवळ एक पाउल दूर आहे. 30 वर्षीय पूजा रानीसमोर पुढील फेरीत चीनच्या की ली कियान या जागतिक क्रमवारीतील तिसऱ्या स्थानावर असलेल्या बॉक्सरचे आव्हान असणार आहे. या लढतीसाठी 31 जुलैला ती बॉक्सिंग रिंगमध्ये उतरेल. (tokyo-olympics-2020-boxer-pooja-rani-struggle-life-journy)
पूजा रानीने मार्च 2020 मध्ये झालेल्या आशिया/ओसनिया ऑलिम्पिक पात्रता फेरीत ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले होते. ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी ती पहिली भारतीय बॉक्सर आहे. याच स्पर्धेत चीनच्या ली कियान हिने सेमीफायनलमध्ये पूजाचा पराभव केला होता. पण तिने यापूर्वी आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये दोन वेळा गोल्डन कामगिरी करताना चीनी बॉक्सरला पराभूत करण्याची क्षमता असल्याचे दाखवून दिले होते. अशीच कामगिरी करुन पदकाच्या शर्यतीतील स्थान पक्के करण्याच्या इराद्याने पूजा बॉक्सिंग रिंगमध्ये उतरेल.
हरियाणातील भिवानी या छोट्याशा गावातून आलेल्या पूजाचा इथपर्यंतचा प्रवास सहज आणि सोपा नाही. खांद्याच्या दुखापतीनंतर तिची कारकिर्द संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली होती. तिचा हातही भाजला होता. शारिरीक दुखापतीशिवाय आर्थिक अडथळ्यांचा खडतर प्रवास पार करुन ती जगातील मानाच्या स्पर्धेत उतरली आहे.
2016 मध्ये झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत तिला पात्रता सिद्ध करता आली नव्हती. एका मुलाखतीमध्ये तिने आपल्यासोबत घडलेल्या भयावह घटनेचा किस्सा शेअर केला होता. ती म्हणाली होती की, दिवाळीत फटाके उडवताना हात भाजला. डाव्या हाताला झालेल्या दुखापतीतून सावरण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागला. यातून सावरुन पुन्हा रिंगमध्ये उतरेल असे वाटत नव्हते. 2017 मध्ये खांद्याला दुखापत झाली. एकापाठोपाठ झालेल्या या घटनेनंतर करियर संपल्याची भावना निर्माण झाल्याचे तिने सांगितले होते.
पूजा रानीचे वडील पोलिस अधिकारी आहेत. बॉक्सिंग हा आक्रमक लोकांचा खेळ असल्याचे वाटत असल्यामुळे पूजाने या खेळाकडे वळू नये, अशी त्यांची भावना होती. वडिलांच्या विरोधानंतरही तिने आपला ध्यास सोडला नाही. आज देशाच्या कानाकोपऱ्यातच नाही तर जगभरातील लोकांचे तिने लक्ष वेधले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.