Tokyo Olympics Men's Hockey : टीम इंडियाने काढला किवींचा जीव

भारतीय संघाने न्यूझीलंडचा 3-2 असा धुव्वा उडवत स्पर्धेत विजयी सलामी दिली
India Men's Hockey Team
India Men's Hockey TeamTwitter
Updated on

जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या भारतीय पुरुष संघाने ऑलिम्पिक स्पर्धेत विजयी सलामी दिलीये, अ गटातील पहिल्या सामन्यात हरमनजीतच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडला 3-2 असे पराभूत केले. मीडफिल्डर विरेंद्र लकडा यानेही लक्षवेधी खेळ केला.

खेळाच्या तिसऱ्या मिनिटाला भारताला पेनल्टी मिळाली. पण रुपिंदर सिंगला या संधीच सोनं करता आले नाही. त्यानंतर भारतीय संघाला पहिला गोल खाल्ला. कर्णधार मनप्रीत सिंगची स्टिक न्यूझीलंडच्या डिफेंडर निक वुड्सच्या चेहऱ्याला लागली आणि या फाउलवर न्यूझीलंडने गोल सामन्यातील पहिला गोल डागला. पेनल्टी कॉर्नवर केन रसेलने न्यूझीलंडला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर बॅकफूटवर आलेल्या भारतीय संघाने आक्रमक खेळ दाखवण्यास सुरुवात केली.

India Men's Hockey Team
Olympics : 'जखमी वाघीण' पदकाचं स्वप्न साकार करण्याची अपेक्षा

रुपिंदर पालने पेनल्टी कॉर्नरवर गोल डागत टीम इंडियाला 1-1 असे बरोबरीत आणले. त्यानंतर न्यूझीलंडने प्रतिआक्रमणाला सुरुवात केली. 19 व्या मिनिटाला भारताचा कर्णधार मनप्रीत सिंगने ललितने मोठा पास दिला. पण याचे गोलमध्ये रुपांतरित करण्यात त्याला अपयश आले. 24 व्या मिनिटालाही विवेक सागरने गोल करण्याची सुवर्ण संधी गमावली. 26 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर हरमनप्रीत सिंगने गोल डागत संघाला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली.

India Men's Hockey Team
SL vs IND : फर्नांडोचा अविष्कार! अखेर लंका जिंकली

33 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर भारताने चांगली रणनिती आखली. यावेळीच्या गोलने भारताने सामन्यावरील पकड 3-1 अशी मजबूत केली. 43 व्या मिनिटाला न्यूझीलंडने अंतर कमी करत स्कोअर बोर्ड 3-1 असा केला. 60 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टीवर न्यूझीलंडला गोल करुन सामना बरोबरीत करण्याची संधी मिळाली होती. पण भारतीय बचावफळीने आपली भूमिका चोख बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.