Tokyo Olympics 2020 स्पर्धेतील सलग तीन पराभवानंतर मिळवलेले अखेरच्या दोन दमदार विजयानंतर क्वार्टर फायनलसाठी वेटिंगवर असलेल्या भारतीय महिला संघाची प्रतिक्षा संपलीये. ब्रिटन महिला संघाने आयर्लंड महिला संघाला 2-0 अशी मात देताच रानी रामपालल्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाची क्वार्टरफायनलमधील जागा पक्की झालीये. ब्रिटन आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यापूर्वी भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला 4-3 अशी मात देत स्पर्धेतील आशा जिंवत ठेवली होती. आयर्लंडच्या पराभवानंतर भारतीय संघाने क्वार्टरफायनलचे तिकीट पक्के झाले. (Tokyo Olympics 2020 Indian Womens Hockey Team advance to the Quarter Finals)
भारतीय महिलांसमोर क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन महिलांचे आव्हान असणार आहे. 2 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सामन्यात रानी रामपालचा संघ ऐतिहासिक कामगिरी करुन आगेकूच करण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सलग दुसऱ्या वर्षी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीय महिला संघाला पहिल्या तीन सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता पहिल्या सामन्यात वर्ल्ड नंबर वन नेदरलँडने भारतीय महिला संघाला 5-1 अशी मात दिली होती. जर्मनीकडून रानी रामपालच्या ताफ्याला 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला. ऑलिम्पिकचा गत चॅम्पियन ब्रिटन महिला संघाने भारतीय महिलांना 4-1 असे नमवले होते.
या पराभवाच्या मालिकेनंतर आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने 1-0 असा विजय नोंदवला. हा भारतीय महिला संघाचा स्पर्धेतील पहिला विजय होता. रिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाला एकही विजय नोंदवता आला नव्हता. यावेळी भारतीय महिला संघ दमदार कामगिरी करताना दिसत आहेत.
अ गटातील भातीय संघ साखळी फेरीतील 5 सामन्यातील 2 विजयासह 6 गुण मिळवत चौथ्या स्थानावर राहिला. नेदरलंडने 5 पैकी 5 सामन्यातील विजयासह अव्वलस्थान मिळवले. जर्मनी 5 पैकी 4 विजयासह दुसरे तर ग्रेट ब्रिटन 5 सामन्यात 3 विजयासह तिसऱ्या स्थानावर राहिला. भारतीय महिला संघासमोर आता ब गटात 5 पैकी 5 सामने जिंकून अव्वल असलेल्या संघाशी भिडावे लागणार आहे. स्पेन महिला संघ 5 पैकी 3 विजयासह ब गटात दुसऱ्या स्थानावर असून अर्जेंटिना आणि न्यूझीलंडचा संघ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहे. गत ऑलिम्पिकमध्ये एकही सामना न जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाने यंदाच्या स्पर्धेत चांगली कामगिरी नोंदवलीये.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.